पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ७९ यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन । कर्मेन्द्रियेः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ७ ॥ सम० अर्जुना इंद्रियांतें जो मनेंकरून आवरी । कर्मेन्द्रियें कर्मयोग करी निष्काम थोर तो ॥ ७ ॥ आर्या-तोचि विशिष्टहि पार्था अंतःकरण दमोनियां करणें । कर्मेद्रियेंचि ज्याला त्यागुनि आसक्ति कर्म तें करणें ॥ ७ ॥ ओंवी— इंद्रियांचे दमन करी स्वभावीं । इंद्रियांहातीं कर्म करवी । कर्म फलाची आशा न धरवी । तोचि श्रेष्ठ म्हणिजे अर्जुना ७ जो अंतरीं दृढ । परमात्मरूपीं गूढ । बाह्य भागू तरी रूढ | लौकिक जैसा ॥ ६८ ॥ जो इंद्रियां आज्ञा करी । विपयांचें भय न धरी । प्राप्त कर्म नाव्हेरी । उचित जें जें ॥ ६९ ॥ तो कर्मेंद्रियें कर्मी । राहतां तरी नियँमी । परी तेथंचेनि ऊर्मी । झांकोळेना ॥ ७० ॥ तो कामनामात्रे न घेपे । मोह- मळें न लिंपे । जैसें जळीं जळें न शिंपे । पद्मपत्र ॥ ७१ ॥ तैसा संसर्गा- माजी असे । सकळांसारिखा दिसे । जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ॥ ७२ ॥ तैसा सामान्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येरवीं निर्धा- रितां नेणिजे | सोय जयाची ॥ ७३ ॥ ऐशा चिन्हीं चिन्हित | देखसी तोचि मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पां ॥ ७४ ॥ अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणोनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूतें ॥ ७५ ॥ तूं मानसा नियम करीं । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियेंही व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥ नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायो हाकर्मणः । शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धयेदकर्मणः ॥ ८ ॥ सम॰—कर्मत्यागाहुनी कर्म श्रेष्ठ तें नित्य तूं करीं । देहनिर्वाहही तूझा न घडे कर्म टाकितां ॥ ८ ॥ आर्या-कर्म बरें न अकर्म स्वीकारी कर्म अवशमात्राही । कर्म त्यजितां पार्था न चले क्षणभर शरीरयात्रा ही ॥ ८ ॥ ओवी - वर्णाश्रमकर्म करीं । कर्म श्रेष्ठ हो अवधारीं । न करितां कर्म व्यजिसी जरी । देह अवसानीं सिद्धि नाहीं ॥ ८ ॥ जो अंतःकरणांत निग्रही आहे, परमात्मस्वरूपांत जो समरस झाला आहे, परंतु जो एकाद्या सामान्य संसारी मनुष्याप्रमाणे बाहेरील व्यवहार करतो; ६८ जो आपल्या इंद्रियांना विषयसेवनाची मोकळीक देतो, पण विषयाचें भय धरीत नाहीं, आणि, जें जें विहित कर्म उपस्थित होईल ते टाळीत नाहीं; ६९ तो, कर्मेन्द्रियं कर्मे करीत असतां, त्यांचे नियमन करितो, पण त्या कर्मापासून होणाऱ्या विकारांनी व्यापला जात नाहीं; ७० तो कोणत्याही कामनेला बळी पडत नाहीं, तो मोहाच्या मळानं माखला जात नाहीं; पाण्यांत तरंगणारं कमळाचे पान जसे पाण्यानं भिजत नाहीं, ७१ तसाच तो निर्लेपपण लौकिक व्यवहाराच्या गुंत्यांत असतो व इतरांसारखाच भासतो; आणि जसे पाण्याच्या संगतीनं सूर्याचं चित्र पृथ्वीवरील वस्तूसारखें वाटतें ७२ तसेच सामान्य दृष्टीने पाहिले असतां, तो साधारण माणसासारखाच वाटतो; परंतु वास्तविक पहातां त्याच्या खऱ्या स्थितीचा पुरा थांग लागतच नाहीं; ७३ अशा या लक्षणांनी युक्त जो आढळेल, तोच आशापाशांतून निसटलेला मुक्त पुरुष समजावा. ७४ अर्जुना, अशा मुक्त पुरुषालाच 'योगी' ही विशिष्ट संज्ञा द्यावी; म्हणून मी तुला म्हणतां कीं, तूं अशा प्रकारचा योगी ' हो. ७५ तूं मनाचं नियमन कर, तुझं अंतःकरण शान्त व स्तब्ध होऊ दे, मग कर्मेंद्रिये हीं खुशाल विषयांमध्ये वावरत राहू दे, ( त्यापासून बाधा होण्याची तुला मुळींच भीति नाहीं. ) ७६ १ मिळलेला, समरस झालेला. २ स्वाधीन ठेवी, नियन्त्रित करी. ३ लाढा, लहरी, ४ घेरला जातो. ५ सामान्य लोका- सारखा, ६ वरपांगी.