पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ सार्थ श्रीज्ञानेश्वरी तरी सांडिलें तें कायी । म्हणोनि कर्मत्यागु नाहीं । प्रकृतिमतां ॥ ५८ ॥ कर्म पराधीनपणें । निपजत से प्रकृतिगुणें । येरीं धरीं मोकली अंतःकरणें । वाहिजे वायां ॥ ५९ ॥ देखें रथीं आरूढिजे । मग जरी निश्चल वैसिजे | तरी चळु होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥ ६० ॥ कां उचलिलें वायुवशे । चळे शुष्क पत्र जैसें । निचेष्ट आकारों । परिभ्रमे ॥ ६१ ॥ तैसें प्रकृतिआधारें । कर्म- द्रियविकारे । नैष्कर्म्यही व्यापारे । निरंतर ॥ ६२ ॥ म्हणऊनि संगु जंब प्रकृतीचा । तंववरी त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ॥ ६३ ॥ कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् । इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ सम० - कर्मेंद्रियें आवरोनी मनीं विषय चिंतितो । नत्रे लावी बसे मूढ तो दंभाचार बोलिजे ॥ ६ ॥ आर्या-कर्मेंद्रियांसि दमुनी विषय स्मरतो मनामधें गूढ । म्हणती त्यातें ज्ञानी मिथ्याचारी सदा महामूढ ॥ ६ ॥ ओवी — कर्मेंद्रियांतें दंडी । मनकल्पना न सांडी । तया नाहीं विषयांची सांडी । म्हणोनि मूर्ख म्हणावें ॥ ६ ॥ जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊ पाहती । परी कर्मेंद्रिय - प्रवृत्ती | निरोधुनी ॥ ६४ ॥ तयां कर्मत्यागु न घडे । जे कर्तव्य मनीं सांपडे । वरी नटती ते फुडे । दरिद्री जाण ॥ ६५ ॥ ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा । ओळखावे तत्त्वतां । भ्रांति नाहीं ॥ ६६ ॥ आतां देई अवधान । प्रसंगें तुज सांगेन । या नैराश्याचें चिन्ह | धनुर्धरा ॥ ६७ ॥ आहे, तोपर्यंत कर्माचा त्याग घडूं शकत नाहीं, ५८ मायेच्या स्वभावबळानेच कर्म आपोआप होत असतं, म्हणून जोपर्यंत माया अस्तित्वांत आहे, तोपर्यंत इतर कोणत्याही निग्रहाच्या पकडीत अंतःकरणं खिळून टाकिलीं, तरी तें कृत्य निष्फळच होतें. ५९ असें पहा, रथावर चढावें, मग जरी आपण निश्चळ बसलों, तरी परतंत्रतेमुळे आपलें चलनवलन होतच राहातें ६० किंवा वारवादळ सुटलें म्हणजे सुकलेलें पान जसें स्वतः चलनवलन न करताही आकाशांत तरंगत भ्रमण करितं; ६१ त्याप्रमाणेच मायेच्या आधारानें कर्मेंद्रियांची डळमळ होऊन, निग्रहानें निरंतर निष्कर्म राहाणाऱ्या पुरुषाच्या हातूनही कर्म घडतेच. ६२ म्हणून जोपर्यंत मायेचा सहवास कायम आहे, तोपर्यंत कर्माचा त्याग होणें शक्य नाहीं. अशा स्थितींत जे म्हणतात, कीं, 'आम्हीं कर्माचा त्याग करणार, ' त्यांच्या हातून हट्टाच्या प्रदर्शनाशिवाय दुसरें कांहींच घडत नाहीं ! ६३ जे विहित कर्माला फांटा देतात, आणि नुसती कर्मेन्द्रियांची हालचाल रोधून, निष्कर्म होण्याचा घाट घालतात, ६४ त्यांना कर्माचा त्याग घडत नाहीं; कारण त्यांच्या मनांत कर्माचे विचार घोळत असतात; मात्र जसा एकादा दरिद्री पुरुष बाहेरचा भपका करून नटतो, तसेच ते नैष्कर्म्याचा नुसता दिखाऊ आय तेवढा घालतात. ६५ अर्जुना, असे पुरुष केवळ विषयांत गुरफटलेलेच समजावे, है निभ्रांत आहे. ६६ आतां तुला प्रसंगवशात् नैराश्याचे लक्षण सांगतों, तें ऐक. ६७