पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ভ७ ॥ ४८ ॥ जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारू असे पाहीं । मग संतुष्टीच्या ठायीं । कुंठे सहजें ॥ ४९ ॥ म्हणोनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदी आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥ ५० ॥ आणि आपुलिये चाडे । आपादिलें हें मांडे । कीं त्यजिलें कर्म सांडे । ऐसें आहे ॥ ५१ ॥ हें वायांचि सैरा बोलिजे । उकल तरी देखोनि पाहिजे । परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानीं ॥ ५२ ॥ न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् । कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ ५ ॥ सम० - कर्म केल्याविणें कोणी कधींही क्षणही नसे । दाहूनि कार्वती कर्मै सर्व प्रकृतिचे गुण ॥ ५ ॥ आर्या-कर्माविण कोणीही क्षणभरि पार्था न राहता अवश । करितो कर्म सदाही प्रकृति गुणालागिं होउनी वश्य ॥ ५ ॥ ओवी - कोणी कर्महीन नसती । क्षण एक कर्मों न सांडिती । दाहूनियां कर्म करविती । प्रकृतीचे गुण जाण ॥ ५ ॥ जंव प्रकृतीचे अधिष्ठानं । तंव सांडी मांडी हैं अज्ञान । जे चेष्टा ते गुणाधीन । पेसी असे || ५३ || देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥ ५४ ॥ सांगें श्रवणीं ऐकावें ठेलें । कीं नेत्रींचें तेज गेलें । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ॥ ५५ ॥ ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मति । कीं क्षुधा - तृपादि आर्ति । खुंटलिया ।। ५६ ।। हे स्वभावबोधु ठेले । चरण चालों विस- रले । हें असो काय निमाले । जन्ममृत्यु ॥ ५७ ॥ हें न ठकेचि जरी कांहीं । अन्न शिजून तयार असल्यास तें कां खाऊं नये ? ४८ जोपर्यंत वासना नष्ट झाली नाहीं, तोंपर्यंत कर्म पाठीशीं लागलंच आहे. अखंड संतोषांत मात्र कर्म आपोआपच बंद पडते. ४९ म्हणून, अर्जुना, हें ध्यानीं घे, कीं, ज्याला नैष्कर्म्य साधण्याची मनापासून इच्छा असेल त्यानं आपले स्वधर्माविहित कर्म टाकतांच कामा नये. ५० आणखी असं आहे, कीं, आपल्या इच्छेनुसार केलेलें कर्म सिद्धीस जाते किंवा त्यागिलेलं कर्म नाहींसें होतं, ५१ असें बोलणें व्यर्थ व वेडेपणाचे आहे. तुला पाहिजे तर या गोष्टीचा नीट उलगडा करून पहा. पण इतकें निःशंक लक्ष्यांत ठेव, कीं, कर्माचा नुसता त्याग केल्यानं तं खरोखर सुटतें असें नाहीं. ५२ जांपर्यंत, गुणांची जननी जी माया, तिचा आधार कायम आहे, तोंपर्यंत आपण अज्ञानानें जें जें आचरतो, तें तं सर्व गुणांवरच आपोआपच अवलंबून राहातं. ५३ असे पहा, आपले जेवढे विहित कर्म आहे, तं जरी मनाच्या उकळीसरसं आपण सोडून दिले, तरी या इंद्रियांचे स्वाभाविक धर्म मरतात काय ? ५४ कान काय ऐकण्याचं सोडतात, कीं डोळ्यांतील तेज नाहींसें होतें, कीं नाकाची वाट बुजून तें वास घेण्याचे टाकतें ? ५५ किंवा या मनाच्या उकळीने प्राणवायु व अपानवायु यांची गति खंडित होते, कीं चित्त निर्विकल्प बनतं, कीं तहानभूक वगैरे इच्छाच खुंटून जातात ? ५६ की जागृति आणि स्वप्न या अवस्था नष्ट होतात, किंवा पाय चालण्याचे विसरतात ? पण या गोष्टी दूरच राहोत. निदान जन्ममृत्यु तरी टळल्यासारखे होतात काय ? ५७ जर यांतील कोणतीच गोट होऊ शकत नाहीं, तर मग कर्म सोडलें तें काय म्हणून, जांपर्यंत मायेचा ठाव टिकला १ निःस्पृहता. २ भाव, अस्तित्व. ३ निद्रा व जागृति.