पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जैसी सिद्धसाध्य भोजनीं । तृप्ति एकी ॥ ३८ ॥ कां पूर्वापर सरिता । भिन्न दिसती पाहतां । मग सिंधुमिळणीं ऐक्यता | पावती शेखीं ॥ ३९ ॥ तैसीं दोनीही मतें । सूचिती एका कारणातें । परी उपास्ति ते योग्यते । अधीन असे ॥ ४० ॥ देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगें नैरु केवीं तैसा । पावे वेगा ॥ ४१ ॥ तो हळू हळू ढाळेंढाळें । केतुलेनि एके वेळे । मार्गाचेनि वळें । निश्चित ठाकी ॥ ४२ ॥ तैसें देख पां विहंगममतें | अधिष्ठनि ज्ञानातें । सांख्य संद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥ येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावते होती ॥ ४४ ॥ न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽभुते । न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४ ॥ सम० - जें कर्मातीत तत्सिद्धी न कर्मे केलियाविण । कर्मसंन्यासमात्रेंची न त्या सिद्धीस पावतो ॥ ४ ॥ आर्या- नैष्कर्म्य तो न पावे कर्माचा जो करी अनारंभ केवळ संन्यासार्ने पुरुषास न मुक्तिचा समारंभ ॥ ४ ॥ ओवी - जे कर्मारंभ न करिती । ते पुरुष मोक्ष न पावती । कर्मे उगीच त्यजिती । तयांसी सिद्धि नाहीं ॥ ४ ॥ वाचोनि कर्मारंभ उचित । न करितां सिद्भवत । कर्महीना निश्चित | होईजेना ॥ ४५ ॥ कीं प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्य होजे । हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥ ४६ ॥ सांगें पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे । तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ॥ ४७ ॥ ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे । कीं सिद्धुही न सेविजे | केवीं सांगें दोहोंचीही जशी क्षुधाशांति हीच अखेरची इतिकर्तव्यता असते, ३८ किंवा पूर्ववाहिनी व पश्चिम- वाहिनी अशा दोन नद्या जरी निरनिराळ्या दिसल्या, तरी समुद्रास मिळाल्यावर त्या जशा अखेरीस एकरूपाला पावतात, ३९ त्याप्रमाणेंच ज्ञानयोग व कर्मयोग हे दोन्ही संप्रदाय एकाच परमार्थ- साधनाचे आहेत, मात्र अधिकारपरत्वें त्यांच्यांत उपासनाप्रकार भिन्न भिन्न आहेत. ४० पहा, पांखरूं उडून चटकन फळाला जाऊन झोंबतें, पण असें माणसाला साधेल काय ? ४१ तो हळूहळू, फांद्या फांद्यांच्या आधारानं, कांहीं काळानें मार्ग आक्रमीत दृढ निश्चयाच्या सामर्थ्याने अखेर फळ गांठतो. ४२ तसेच, पक्ष्याच्या पद्धतीनें, ज्ञानाच्या जोरावर सांख्य हे तत्काळ मोक्ष मिळवितात. ४३ पण कर्मयोगी हे आपल्या स्वधर्मास उचित असें कर्मे आचरीत सावकाश योग्य वेळीं, (म्हणजे ज्ञानोत्तरकाळी) मोक्षाला पावतात. ४४ आरंभी योग्य विहित कर्मों केल्यावांचून, जर कोणी ' सिद्धाप्रमाणें कर्म सोडून देईन,' म्हणेल, तर त्या कर्महीनाला तें नैष्कर्म्य मुळीच घडणार नाहीं. ४५ कारण, जें कर्तव्य प्राप्त झालें आहे, तें सोडलं म्हणजे तेवढ्यानंच नैष्कर्म्य सिद्ध होतें, असें समजणं मूर्खपणाचें आहे. ४६ हे पहा, नदीच्या पैलतीरी जाणे हे जेथे पुरामुळे संकटाचे झाले आहे, तेथें होडीला टाकून देणें हें शहाण- पणाचे होईल काय ? ४७ अथवा, जर क्षुधाशांतीची इच्छा आहे, तर अन्न कां शिजवू नये, अगर १ सिद्धभोजन म्हणजे ज्ञानयोग आणि साध्यभोजन म्हणजे कर्मयोग. २ उपासना, अभ्यास, ३ झेंप टाकल्याबरोबर ४ मनुष्य. ५ पक्षिन्यायाने, पक्ष्यासारखें, विहंगम मार्गानं. ६ तत्काळ ७ हे दोन्ही मार्ग वगळून.