पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तिसरा ७५ विजयी माझे ॥ २७ ॥ जी जी परममंगळधामा | सकळदेवदेवोत्तमा । तूं स्वाधीन आज आम्हां । म्हणऊनियां ॥ २८ ॥ जैसें मातेच्या ठायीं । अपत्या अनवमरु नाहीं । स्तन्यांलागूनि पाहीं । जियापरी ॥ २९ ॥ तैसें देवा तूतें । पुजितसे आवडतें । आपुलेनि आतें । कृपानिधी ॥ ३० ॥ तरी पारत्रिकी हित। आणि आचरितां तरी उचित । तें सांगें एक निश्चित | पार्थ म्हणे ॥ ३१ ॥ श्रीभगवानुवाच — लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाऽनघ । ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम् ॥३॥ सम० - या लोकीं दोंपरी निष्ठा पूर्वी जे म्यां निरूपिली । ज्ञानयोगेंचि सांख्यांला सरक में कर्मयोगियां ॥ ३ ॥ आर्या-लोकीं द्विविधा निष्ठा सांगितली निश्चितार्थ मीं वदुनी। कर्मी जे त्यां कर्म ज्ञान्यांसी ज्ञानयोग हे दोनी ॥ ३ ॥ ओवी - दों प्रकारची निष्ठा । पूर्वी सांगितली भारता । सांख्यमती ज्ञानदाता । योगियास कर्मयोग बोलिजे ॥ ३ ॥ या बोला श्रीअच्युत । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥। ३२ ॥ जे बुद्धियोग सांगतां । सांख्यमतसंस्था । प्रकटिली स्वभा- वता । प्रसंगें आम्हीं ॥ ३३ ॥ तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणोनि क्षोभलासि वायांचि। तरी आतां जाणें म्यांचि । उक्त दोन्ही ॥ ३४ ॥ अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा | अनादिसिद्धा ||३५|| एक ज्ञानयोग म्हणिजे | जो सांख्यी अनुष्टिजे । जेथ वोळखीसवें पाविजे । तद्- पता || ३६ || एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होऊनियां निर्वाण | पावती वेळे ॥ ३७ ॥ हे मार्ग तरी दोनी । परी एकवटती निदानीं । माझ्या मनोरथांना आज पूर्ण विजय मिळाला, २७ कारण, तुम्ही आज आम्हांला सर्वस्वी अनुकूल झाला आहां. हे परम मंगलमया, देवदेवेश्वरा, तुमचा मी जयजयकार करतो. २८ ज्याप्रमाणें आई- संबंधें मुलाला काळवेळ नसते, वाटेल तेव्हां त्याला स्तनपान करण्यास मुभा असते, २९ त्याप्रमाणे, हे कृपासागरा देवा, मी आपल्या आवडीला अनुसरून मोठ्या हौसेने प्रश्न केला आहे. ३० म्हणून जें केलें असतां पारलौकिक हित व लौकिक हित अशीं दोन्ही साधतील, असें कांहीं तरी निश्चयाने सांगा." असं अर्जुन म्हणाला. ३१ हे ऐकून श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “अर्जुना, माझ्या बोलण्याचा इंगितार्थ असा, ३२ कीं, तुला बुद्धियोग स्पष्ट करून सांगत असतां आम्हीं सहज स्पष्टीकरणाच्या ओघांत सांख्यांचा ज्ञानयोगही कथन केला. ३३ परंतु यांतला हेतु तुझ्या मुळींच ध्यानांत आला नाहीं, म्हणून तुझी उगीचच कालवाकालव झाली आहे. पण, आतां ही एक गोष्ट ध्यानीं घे, कीं, हे दोन्ही संप्रदाय मीच सांगितलेले आहेत. ३४ हे थोर वीरा, हे दोन्ही संप्रदाय अनादिकालापासून मीच प्रकट केलेले आहेत. ३५ यांत एक जो ज्ञानयोग म्हणतात, त्याला सांख्यवादी अनुसरतात, आणि या ज्ञान- योगाची ओळख झाली म्हणजे जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. ३६ दुसऱ्याला कर्म- योग म्हणतात. हा ज्यांना साधला, ते उचित आचार करणारे साधक पुरुष योग्य वेळीं मोक्ष पाव- तात. ३७ हे मार्ग प्रथमतः दोन निरनिराळे असे वाटतात, परंतु परिणामाचा विचार केला, तर तेथे ते एकत्र मिळतात. शिजवून तयार झालेलें अन्न आणि अद्याप शिजवावयाचे असलेले अन्न, या १ अकाल, अयोग्य वेळ, २ अंगावरच्या दुधाविषयीं. ३ सूचित, अभिप्रेत मोक्ष. ५ अखेरीस,