पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ सार्थ श्रीज्ञानेश्वरी जाणवेना ॥। १६ ।। म्हणोनि आइके देवा । हा भावार्थ आतां न बोलावा । मज विवेक सांगावा | महाटा जी ॥ १७ ॥ मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकं परियेसें । श्रीकृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥ १८ ॥ देखें रोगातें जिणावें | औषध तरी देयावें । परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें ॥ १९ ॥ तैसें सकळार्थभरित । तत्त्व सांगावें उचित । परी बोधे माझें चित्त । जयापरी ॥ २० ॥ देवा तुज ऐसा निजगुरु | आजि आर्ती- धणी कां न करूं । एथ भीड कवणाची धरूं । तं माय आमुची ॥ २१ ॥ हां गा कामधेनूचें दुभतें । दैवें जाहलें जरी आपते । तरी कामनेची कां तेथें । वाणी कीजे ॥ २२ ॥ जरी चिंतामणी हाता चढे । तरी वांछेचें कवण सांकडें । कां आपुलेनि सुरवाडें । इच्छायें ना || २३ || देखा अमृतसिंधू टाकावें । मग ताहानाचि जरी फुटावें । तरी सायासु कां करावे | मागील ते ॥ २४ ॥ तैसा जन्मांतरीं बहुतीं । उपासितां श्रीलक्ष्मीपती । तूं देवें आजि हातीं । जाहलामी जरी ।। २५ ।। तरी आपुलिया सावेशां । कां न मागावासि परेशा । देवा सुकाळ हा मानसा । पाहला असे || २६ || देखें सकळातींचें जियोलें । आजि पुण्य यशासि आलें । हे मनोरथ जहाले । तत्त्वाचे प्रतिपादन करीत आहां, याचा खचितच मला कांहीं सूड लागत नाहीं. १६ म्हणून, देवा, माझी प्रार्थना अशी आहे, कीं, ही गूढ भाषा आतां पुरे. आपला विचार मला सोप्या सरळ भाषेत कथन करावा. १७ मी अतिमंद बुद्धीचा आहे; तेव्हां आतां असें सरळ व निश्चित बोला, कीं मंद- बुद्धीच्या मलाही चांगला उलगडा पडावा. १८ अहो, रोग्याचा रोग दूर करणं मनांत असेल, तर औषध है दिलेच पाहिजे, परंतु तं रुचिकर व गोड असणे जसे चांगलं, १९ तसेंच खोल अर्थानं परिपूर्ण तत्त्ववोधाचं भाषण आपण करावे, पण ते मला उमजेल असे असावे. २० देवा, तुम्हांसारखे खरखरे आत्मबोधाचे उपदेश देणारे गुरु, मग आम्हीही आमची आवड कां बरें पुरवूं नये ? देवा, तुम्हीच आमची माउली आहां, मग येथे संकोचाला जागा तरी आहे का ? २१ अहो, दुभती कामधेनूच जर लाभली, तर नुसती इच्छा करायला कोण कमी करील ? २२ जर चिंतामणीच हाती आला, तर मग इच्छा करणं काय अवघड ! खुशाल आपल्या मनास येईल ती इच्छा करावी ! ( कारण ती ताबडतोब पुरी होणारच ). २३ किंवा अमृतसमुद्राजवळ यावे, आणि तहानेनें तडफडावें, असें जर असेल तर अमृतसागराजवळ येण्याचे पहिले श्रम तरी कशाला करावे ? २४ त्याप्रमाणेच, हे देवा लक्ष्मीपते, अनेक जन्मपर्यंत तुमची उपासना करितां करितां तुम्ही जर सुदैवाने आतां आम्हांला लाभला आहां, २५ तर मग आम्ही आपल्या हौसेप्रमाणं, हे परमेश्वरा, तुमच्याजवळ कां मागणं करूं नये ? देवा, आमच्या मनाला हा सुबत्तेचाच काळ उजाडला आहे ! २६ आमच्या सर्व इच्छांना आज नवीन चैतन्य आलें, आमचें पुण्य फळास लागलें १ आपले, २ आवडीने. ३ आवेशाने, इच्छेच्या उसळीप्रमाणे. ४ सर्व इच्छांचे जिवंतपण.