Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.

प्र० भाषणास किंवा ग्रंथास शोभादेणारे असे मुख्य अ लंकार कोणते ?
उ० मुख्य अलंकार व त्याचे एक एक उदाहरण पुढे सांगतो.
 १ उपमा ह्मणजे एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाचे सारिखा असे ह्मणणें उदा० " जो धैर्ये धरसा सहस्त्र करसा तेजें जसा दूसरा.”
 २. उत्प्रेक्षा; ह्मणजे काही एका धर्मेकरून जे दोन पदार्थ सदृश असतात, त्यांतून एकास दुसरा असें जें ह्मणती. उदा०"तो मंडलाकृति फिरे उतरावयाला"
 “भैमी मुखेंदु परिवेष ह्मणूंत याला"
 ३ व्याजस्तुति; ह्मणजे स्तुति करावी, परंतु वास्तविक नि दा असावी. उदाहरण.

“वधुनिमाझीहेकनकरूपकाया"

"कनकमुकुटा दिभूषणें कराया "

" कशी आशातुजउद्धबलीराया"

“थोर औदार्य फार दयामाया "

 व्याजनिंदा ह्मणजे एकाचा निंदेने दुसऱ्याची निंदा किंचा निदेने तृती: निंदा करावी, परंतु मनांत स्तुती