Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
सारसंग्रह.

दृढ स्मरण, आणि स्पष्ट उच्चार इतके गुण पाहिजेत.
प्र० भाषणाचे मुख्य भाग कोणते?
उ० पांच, १ प्रस्तावन, २ निरूपण, ३ स्थापन, ४ कु ठन, ५ उपपादन.
प्र० या पांच भागांचे प्रत्येकी स्वधूप कोणते ?
उ० १ प्रस्तावन लणजे जो मुख्य विषय सांगायाचा असतो, त्याचा प्रसंग आणा यासाठी जे अगोदर भाषण ते. तेणें करून श्रोत्यांचे चित्त उत्तर ग्रंथ ऐकायास सिद्ध होते.
 २. निरूपण ह्मणजे जे मुख्य बोलायाचें तें सांगणें- या करितां हें निरूपण स्पष्ट शब्दांनी आणि सुबोध रीतीनें करावें.
 ३ जो सिद्धांत केला त्यास अनेक प्रकारचा उपपत्ति सांग त्याचे नाव स्थापन.
 ४ कुंठन ह्मणजे आपल्या सिद्धांताशी विरुद्ध जे वादीचे भाषण में खोट करावयाविषयी जो बाद ते, हे कुंठन क ठोर शब्दांनी केले पाहिजे.
 ५ उपपादन ह्मणजे सर्व भाषणांचे मुळापासून शेवट पर्यंत संक्षेपतः पुनः कथन. याचा उपयोग हाकी सर्व वि षय श्रोत्यांचा मनांत पणी रहाचा.