Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५७

सारसंग्रह.

प्र० गायन मुळी कोणी यो जिलें ?
उ० या विषयी बहुत कथा आहेत; परंतु त्या सत्य मान ण्यास काही प्रमाण नाहीं, ह्मणून तो विचार करून काही फळ नाही, गायनाची यंत्रे मात्र आलीकडचा पुरुषांनी आपल्या कल्पनेने केली, असें हाटले तर होईल.
प्र० गायनांतील सर्व रागरागिणीस मूळ कोणते ?
उ० सात स्वर मूळ, त्यांची नावें. षड्ज. ऋषभ, गांधा- र, मध्यम, पंचम, धैवत. निषाद.



प्रकरण३५
साहित्य शास्त्र:

प्र० साहित्य शास्त्र ह्मणजे काय ?
उ० साहित्यशास्त्र ह्मणून विद्या आहे, जिचा साहाय्या ने मनुष्यांस ग्रंय करितां आणि बोलता येते, तेणेंकरू न लोकांचे मनोरंजन होते; आणि त्यामुळे ते भाषण बाणते ?
प्र० उत्तम वक्ता व्हायास कोणते गुण अवश्यपाहिजे ?
उ० नव्या नव्या कल्पना रूचा याजोगी बुद्धि, वास्तवि क विचारध्ये प्रवीणता, समयसूचकता.