हे पान प्रमाणित केलेले आहे.
२९
सारसंग्रह.
| उ० | होय, होते यांत संशय नाहीं. धर्म आहे ह्मणून लोक एकमेकाचा विश्वास धरून प्रीति करितात, आणि सुखाने वागतात; तसेच धर्मामुळे मनुष्याचा मनांत सत्य, औदार्य, उद्योग, आणि संसारिकपणाही राहतात. |
प्रकरण १५
ध्वनि.
| प्र० | ध्वनिशास्त्र ह्मणजे काय ? |
| उ० | ध्वनिशास्त्र हाणजे स्वरांचा विचार. |
| प्र० | याचे भाग किती? |
| उ० | दोन, ध्वनिविचार आणि प्रतिध्वनि विचार. |
| प्र० | या दोन भागांत काय आहे ? |
| उ० | सनाद पदार्थापासून आपल्या कानाशी सरळ ध्वनि येतात त्यांचा धर्माचा विस्तारे करून विचार; आणि दुसऱ्या भागांत प्रतिध्वनीचे वर्णन केले आहे. |
| प्र० | या शास्त्राचा मोठा उपयोग कोणता ? |
| उ० | यावरून संगीत, गणिताचा आधारावर लावितां येते. हा याचा उपयोग. एक अशी गोष्ट अनुभ- |