Jump to content

पान:सारसंग्रह.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सारसंग्रह.
प्रस्तावना.

 या लहान ग्रंथापासून दुसरे काही नाही तर मुलांस सर्व विषयांचे मूळ स्वरूपांचें ज्ञान तरी होईल; असे की, पुढे ते सर्व विषय शिकायास त्यांस अधिकार येईल. सर्व ग्रंथ पाठ के- ला असतां सहज स्मरणांत रहावा, ह्मणून विद्या आणि कला यांची स्वरूपें अतिसंक्षेप रूपानें वर्णिली आहेत. अशा संक्षि सग्रंथांत कोणत्याही विषयाचा फार विस्तार करितां येत ना हीं; तथापि थोड्या बहुत गोष्टी लिहिल्या आहेत त्या सत्य आहेत, आणि त्या विद्येची वृद्धि व्हावयास उपयोगी पडा व्या, अशी इच्छा आहे. या पुस्तकांत विद्या आणि कला- यांचा क्रम मूलाक्षराप्रमाणे धरिला आहे; तेणेंकरून कोणताही विषय पाहायाचा असला तर त्वरित सांपडे ल.