पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ मित्रस्य वरुणस्य अग्नेः--उपलक्षणं एतत् तदुपलक्षितानां जगतां इत्यर्थ:- मित्र वरुण अग्नि ह्यांवरून सर्व जग समजावयाचे. सर्व जग ह्मणण्याऐवजी मित्र वरुण अग्नि हे सूचक शब्द घातले आहेत. आअप्राः = [ स्वकीयेन तेजसा ] आ समन्तात् अपूरयत् . आत्मा = स्वरूपभूत: सूर्य हा सर्व स्थावरजंगमांचें स्वरूपच आहे. कारण सर्व स्थावरजंगमात्मक कार्याचें सूर्य हा कारण आहे व कारण आणि कार्य मध्यें अन्यत्व नसतें तर ऐक्यच असतें हें सर्वप्रसिद्धच आहे. अथवा “आत्मा” ह्या पदाचा अर्थ “ जीवात्मा" असा करावा. सूर्य हा जगताचा जीवात्मा आहे कारण अगोदर मृतप्राय असलेलें जग सूर्योदय झाल्या- वर पुन्हां सचेतन होतें. जगतः = जंगमस्य. तस्थुषः = स्थावरस्य. मराठी अर्थ-मित्र, वरुण, अग्नि ह्यांनी उपलक्षित जें हैं जगत् त्याला प्रकाश देणारें अथवा नेत्राप्रमाणें शोभणारें ( चक्षुर्मित्रस्य वरुणस्याग्नेः ) असें बें हें रश्मींच्या ( देवानां ) समूहरूपी आश्चर्यकारक ( चित्रं ) असें सूर्यमंडल ( अनीकं ) तें उदयाचलावर प्राप्त झालें ( उदगात् ). [ उदय पावल्यानंतर ह्या सूर्यमंडलानें ] द्युलोक, पृथिवी [व] अंतरिक्ष ह्यांना [ आपल्या तेजानें ] परिपूर्ण करून टाकिलें ( आअप्राः समन्तात् अपूर- यत् ). सूर्य हा ह्या स्थावरजंगमात्मक विश्वाचा ( जगत: तस्थुषश्च ) जीवात्मा आहे [ कारण सूर्योदयानंतर त्यामध्यें चैतन्य दिसूं लागतें ]; अथवा, सूर्य हा ह्या स्थावर जंगमात्मक जगताचे स्वरूपच आहे ह्म० ह्या स्थावरजंगमात्मक जगता च्या रूपानें सूर्य हा नटून राहिला आहे. [ कारण सूर्य हा ह्या सर्वांचें कारण आहे व कार्य हैं कारणाचें एक विशिष्ट स्वरूप असून कार्याचें खरें स्वरूप कारणच असतें हें प्रसिद्धच आहे. ].