पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७ ऋचा २१ वी :- उत्तमं - शिरोगतं, हें पाशाचे विशेषण. उम्मुमुग्ध - उत्कृष्य मोचय. मध्यमं=उदरगतं. उदरावरचा [ पाश ]. विचृत-वियुज्य नाशय. अधमानि=पादगतान् [ पाशान् हें अध्याहृत घ्यावयाचें ]. अववृत = अवकृष्य नाशय. जीवसे=जीवितुं, आह्मी जगावें ह्मणून. मराठी अर्थ - आमचा (नः) मस्तकाचा पाश ( उत्तमं पाशं ) सोडून टाक ( उन्मुमुग्धि ); आमचा उदरावरील पाश [ही] ( मध्यमं ) तोडून टाक (विचृत), [आणि] आह्मीं जगावें ह्मणून ( जीवसे) आमच्या पायांच्या [पाँशां- चाही ] नाश कर ( अवचूत. ) ऋचा १ ली:- चित्रं- आश्चर्यकरं. मंडल १ सूक्त ११५. ( पीटर नं. ३. ) देवानां - दीव्यन्ति इति देवाः रश्मयः तेषां देवजनानां एव वा. उद्गात् उदयाचलं प्राप्तं आसीत्. अनीकं = तेजःसमूहरूपं सूर्यस्य मंडलं. चक्षुः = प्रकाशकं चक्षुरिन्द्रियस्थानीयं वा, मित्र वरुण अग्नि इत्यादिकांना प्रकाश देणारें अथवा मित्र वरुण अभि इत्यादिकांना नेत्राप्रमाणें असणारें [ सूर्य- 'मंडल ]. " तुकाराम तात्यांच्या प्रतीमध्ये " प्रकाशकं चक्षुरिन्द्रियस्थानीयं च असा पाठ आहे. परंतु कोणचाही पाठ घेतला तरी अर्थामध्ये फारसा बदल होत नाहीं.