पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋचा १६ वी:-- १४ परा यन्ति = पराङ्गमुखाः निवृत्तिरहिताः गच्छन्ति. मे=शुन: शेपस्य. धीतयः=बुध्दयः, गाव: न गावः यथा, गाई जशा. गव्यूती:- गोष्ठानि, गोठे. गावः यत्र यूयन्ते सा गव्यूति: . अनु=अनुलक्ष्य. उरुचक्षसं बहुभिर्द्रष्टव्यं. मराठी अर्थ - पुष्कळ लोक ज्याच्या दर्शनाची इच्छा करितात त्या ( उरुच- क्षसं ) वरुणास भेटण्याला इच्छिणारे ( इच्छन्तीः ) माझें [ शुनःशेपाचे ] मन ( धीतयः = युद्धयः), ज्याप्रमाणे गाई ( गावः ) गोठ्याकडे (गव्यूतीरनु ) धांव घेतात त्याप्रमाणें [ वरुणाकडे ] पुन्हा परतण्याची इच्छा सोडून जाऊं लागतें (परायन्ति पराङमुखाः निवृत्तिरहिताः गच्छन्ति ). ऋचा १७ वी:- - ही ऋचा कठीण आहे. नु=अवश्यं. संवोचावहै-संभूय प्रियवार्तां करवावहै, दोघे मिळून गोष्टी करूं या. पुनः - हविः स्वीकारात् ऊर्ध्व, तूं हवीचा स्वीकार केल्यानंतर. यतः यस्मात् कारणात् मे-मज्जीवनार्थ, माझ्या जीवनाकरितां माझें आयुष्य वाढावें ह्मणून. मधुमधुरं हविः. आभृतम्-अंजः सवाख्ये कर्मणि संपादितम्, अंज:सव नांवाच्या यागामध्ये तयार केलेलें आहे. ह्याच्यापुढे " अतः कारणात् " हें अध्याहृत घ्यावें. होते व होमकर्तेव. क्षद से = अश्नासि.