पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ अभिमातयः = पाप्मानः. ह्याच्यापुढें “ न स्पृशन्ति " हैं अध्याहृत घ्यावें. मराठी अर्थ - वध करण्याची इच्छा करणारे वैरी ( दिप्सवः ) ( [ भीतिग्रस्त होऊन] ज्या वरुणाला मारण्याची इच्छा टाकून देतात ( न दिप्स - न्ति ), [आणि] सर्व लोकांचा (जनानां ) द्रोह करणारे लोक ( हृाण: ) [ ज्या वरुणाचा द्रोह करीत नाहींत, [ हें येथें अध्याहृत आहे ] [ त्या वरुण ] देवाला पातकी लोक [ ही ] [ स्पर्श करीत नाहींत. हेंही येथें अध्याहृत आहे ]. " ह्या वाक्यामध्यें "न द्रुह्यन्ति ब" न स्पृशन्ति " हीं दोन क्रियापदें अगदीं केवळ अध्याहृतच नाहींत. दोन्ही क्रियापदांतील "न" हें पद मुळामध्यें आहेच. तेव्हां हीं क्रियापदें अध्याहृत घेतली आहेत असें ह्मणण्यापेक्षां तीं मुळा- मधील “ न ” वरून सूचित झालीं आहेत असें ह्मणणे जास्त सयुक्तिक आहे. ऋचा १५ वी :- ही ऋचा समजण्यास कठिण आहे. उत= अपिच. यश:-अन्नं. आचक्रे = सर्वतः कृतवान् असामि= संपूर्ण [ चक्रे न तु न्यूनं कृतवान् ]. हैं अव्यय आहे. मराठी अर्थ - शिवाय ( उत), ज्या वरुणानें ( यः ) मनुष्यांमध्यें ( मानुषेषु) ह्म० मनुष्याकरितां, चोहोंकडे अन्न ( यश:) उत्पन्न केलें (आचक्रे ), त्यानें, [ तें अन्न नुसतें उत्पन्न केलें इतकेंच नव्हे तर, ] चोहोंकडे ( आ ) [ तें अन्न ] पुरेल इतकें ( असामि- संपूर्ण ) [ उत्पन्न केलें. कमी पडेल अशा रीतीनें कांहीं त्यानें तें उत्पन्न केलें नाहीं. आणि विशेषतः ] आमच्या उदरामध्ये ( अ- स्माकं उदरेषु ) अगदीं भरपूर ( आ ) [ असें अन्न त्यानें दिलें. ] ह्या वाक्यामध्ये तीन वेळां "आ" आलेला आहे त्यामुळे घोंटाळा पडतो व पुनरुक्ति झाल्यासारखी वाटते. वास्तविक, तिन्ही ठिकाणीं " आचक्रे " दें क्रियापद घ्यावयाचें आहे.