पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आयूंषि = आयुष्यें. प्रतारिषत्=प्रवर्धयतु. १२ मराठी अर्थ -- चांगल्या बुद्धिमत्तेनें युक्त ह्म० फार बुद्धिमान् (सुक्रतुः ) जो आदित्य ह्म० वरुण तो आह्मांला (नः) सदोदित (विश्वाहा ) सुमार्गाशीं युक्त करो ( सुपधा करत् ) [ आणि ] तो आमचें ( नः ) आयुष्य (आयूंषि) पुष्कळ वाढवो ( प्रतारिषत् ). ऋचा १३ वी:- - बिभ्रत्= धारयन्, धारण करीत होत्साता. द्रापिं कवचं. हिरण्ययं सुवर्णमयं. वस्त=आच्छादयति. निर्णिजं=पुष्टं स्वशरीरं. स्पशः = हिरण्यस्पर्शिनः रश्मयः. परिनिषेदिरे = सर्वतो निषण्णाः. मराठी अर्थ - सुवर्णाचें ( हिरण्ययं ) कवच ( द्वापिं ) धारण करीत होत्साता ( बिभ्रत् ) हा वरुण आपलें पुष्ट शरीर ( निर्णिजं ) आच्छादन करितो ( वस्त) त्या सुवर्ण कवचाला स्पर्शन बाहेर निघणारे रश्मि ( स्पशः ) चोहोकडे पसरले जातात ( परिनिषेदिरे - सर्वतो निषण्णाः ). ऋचा १४ वी :- न दिप्सन्ति =भीताः सन्तः हिंसितुं इच्छां परित्यजन्ति. दिप्सवः = हिंसितुमिच्छन्तः वैरिणः. वाण: = द्रोग्धारः [ अपि ], द्रोह करणारे [ ही ]. ह्याच्यापुढे “न दृत्यन्ति " हें अध्याहृत घ्यावें. जनानां=प्राणिनां ह्याचा अन्वय "दुवाण: " ह्याबरोबर. जनानां ब्रुवाणः.