पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११

 सुक्रतुः शोभनकर्मा.
 मराठी अर्थ - आमच्या यागादि कर्माचा ज्याने स्वीकार केला आहे ( धृतव्रतः ) व ज्याचीं कृत्ये फार चांगली आहेत ( सुक्रतुः ) असा वरुण, 'देवांमध्यें ( पस्त्यासु ), त्यांच्यावर साम्राज्य करावें ह्मणून (साम्राज्याय ), येऊन बसता झाला ( आनिषसाद - आगत्य निषष्णवान् ).
ऋचा ११ वी:-
 अतः अस्माद्वरुणात्.
 विश्वानि सर्वाणि.
 अद्भुता=आश्चर्याणि.
 चिकित्वान् = प्रज्ञावान्, सुज्ञ मनुष्य.
 अभिपश्यति = सर्वतः अवलोकयति, चोहोकडे पहातो.
 या कृतानि यानि आश्चर्याणि पूर्व वरुणेन संपादितानि.
 या च कर्त्या यानि च आश्चर्याणि इतःपरं कर्तव्यानि तानि सर्वाणि अभिपश्यति.
 मराठी अर्थ -- प्रज्ञावान् मनुष्य जो आहे तो (चिकित्वान् ) ह्या वरुणा- पासून उगम पावलेलीं ( अतः ) सर्व आश्रये ( विश्वानि अद्भुता ) - की जो [कांहीं] वरुणाने करून ठेविलेली आहेत ( कृतानि ) व जी वरुणाकडून इतः पर घडणार आहेत ( या च कर्त्वा ) -- ती सर्व आश्चर्ये चोहोकडे अवलोकन करितो ( अभिपश्यति ).
ऋचा १२वी:-
 विश्वाहा=सर्वेषु अहःसु.
 सुक्रतुः शाभनप्रज्ञः.
 आदित्यः = वरुणः.
 सुपथा करत - शोभन मार्गेण सहितान् करोतु. “ सहितान् " हैं अध्याहृत घेतलेले आहे.