पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०

 मराठी अर्थ -आमच्या कर्माचा ज्याने स्वीकार केला आहे असा ( धृतव्रतः ) [ वरुण ] त्या त्या महिन्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्राणिवर्गासहित ( प्रजावतः ) बारा महिन्यांना जाणतो (वेद), व [ एखाद्या वर्षाला ] जोडून जो (य: ) [ तेरावा अधिक महिना ] आपोआप उत्पन्न होतो. त्याला [ ही ]. [ वरुण ] जाणतो.
ऋचा ९ वी:.-
 वानस्य वायोः.
 वर्तनि=मार्ग.
 उरो: विस्तीर्णस्य, ह्याचा अन्वय 'वातस्य " ह्या पदाबरोबर.
 ऋष्वस्य=दर्शनीयस्य.
 बृहतः=गुणैः अधिकस्य.
 ये= देवाः.
 अध्यासते= उपरि तिष्ठन्ति.
 मराठी अर्थ - विस्तीर्ण ( उरोः ), दर्शनीय ( ऋष्वस्य ) [व] गुणां- न श्रेष्ठ ( वृहतः ) अशा वायूचा ( वातस्य ) मार्ग ( वर्तनिं ) [ वरुण ] जाणतो [ व ] जे [ देव त्या वायूच्याही वरती ] राहतात (अध्यासते ) त्यांनाही हा जाणतो.
ऋचा १० वी:-
 आनिषसाद = आगत्य निषण्णवान्.
 धृतव्रतः = स्वीकृत कर्मविशेषः, आमच्या यज्ञाचा ज्याने स्वीकार केला आहे असा.
 पस्त्यासु = दैवीषु प्रजासु, देवांच्यामध्यें.
 साम्राज्याय प्रजानां साम्राज्यसिध्यर्थम्, त्या प्रजांवर साम्राज्य करावें ह्मणून. सम्राजो भावः साम्राज्यम् .