पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( धृतव्रताय ) व ज्यानें हवि दिला आहे, अशा यजमानाला ( दाशुषे ) [ भेटीचा लाभ द्यावा अशी ] इच्छा करणारे ( वेनन्ता) मित्रावरुण, आह्मी जो दोघांना मिळून दिलेला होता ( समानं ) तोच हवि ( तत् इत् ) भक्षण करितात (आशा), [ कधीही ] चुकत नाहींत ( न प्रयुच्छतः )
ऋचा ७ वीः-
 वेद= [ जो ] जाणतो.
 वीनां पक्षिणां.
 अंतरिक्षेण= आकाशमार्गेण.
 पततां=गच्छतां.
 नावः =नौकेचें [ ही पद ].
 समुद्रियः समुद्रे अवस्थितः [ य: वरुणः ]
मराठी अर्थ - आकाश मार्गानें (अन्तरिक्षेण) उडणाऱ्या (पततां ) पक्ष्यांचा ( वीनां) मार्ग ( पदं ) जो [ वरुण] जाणतो (वेद), व जो समुद्रांत वास करणारा ( समुद्रिय: ) [ वरुण] नौकेचा [ही ] ( नाव: ( मार्ग पदं ) जाणतो (वेद), [ तो वरुण आह्मांला बंधनापासून मुक्त करो. अध्या०]
ऋचा ८ वी:-
 मासः = [ बाराही ] महिने.
 धृतव्रतः = स्वकृत कर्मविशेषः, आमच्या यज्ञाचा ज्याने स्वीकार केला आहे असा.
 प्रजावतः तदा तदा उत्पद्यमानप्रजायुक्तान्, त्या त्या महिन्यामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्राणिवर्गासहित. हें मासांचें विशेषण.
 यः = जो तेरावा अधिक महिना - Intercalary month. उपजायते= संवत्सरसमीपे स्वयमेव उत्पद्यते, एखाद्या वर्षास जोडून आपोआप उत्पन्न होतो.