पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऋचा ५ वीः-
 क्षत्रश्रियं = बलसेविनं.
 नरं = नेतारं.
 आकराम हे = अस्मिन्कर्मणि आगतं करवाम, या यज्ञामध्यें आणूं.
 मृळीकाय = अस्मत्सुखाय.
 उरुचक्षसं=बहूनां द्रष्टारं. ह्याचा अन्वय वरुण ” ह्या पदाबरोबर.
 मराठी अर्थ - महासामर्थ्यवान् ( क्षत्रश्रियं ), [ सर्व जगाचा ] नेता ह्म० धुरीण अथवा मार्गदर्शक (नर) आणि सर्व प्राणिमात्रांवर नजर ठेवणारा ( उरुचक्षसं ) असा जो वरुण त्यांला आह्मी आपल्या सुखाकरितां (मृळीकाय) [ त्या यज्ञामध्यें ] केव्हां आणण्यास समर्थ होऊं बरें ! (आकरामहे=आगतं ) करवाम ) !
ऋचा ६ वी:-
 तत् इत् = अस्माभिर्दत्तं तदेव हविः, आह्मी दिलेला तोच हवि.
 समानं = साधारणं, दोघांतही एकच दिलेला, दोघांना निरनिराळा न दिलेला.
 आशाते=अश्नुवाते, भक्षण करितात.
 वेनन्ता=[ यजमानाय ] कामयमानौ [ मित्रावरुणौ इति शेषः ], [ यजमानाला भेटीचा लाभ द्यावा आणि त्याच्यापासून आपला हविर्भाग घ्यावा अशी ] इच्छा करणारे [ मित्रावरुण ].
 न प्रयुच्छतः = कदाचिदपि प्रमादं न कुरुतः, कधीही चुकत नाहीत.
 धृतव्रताय=अनुष्ठितकर्मणे, ज्यानें [ मित्रा वरुणांना उद्देशून ] यज्ञया-
गादिक कर्म केलें आहे त्याला.
 दाशुषे हविर्दत्तवते यजमानाय हवि देणाऱ्या यजमानाला. मराठी अर्थ - [ मित्रावरुणांना उद्देशून ] ज्याने यागादि कर्म केलें आहे,