पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गीर्भिः=स्तुतिभिः.
 विसीमहि=विशेषेण बध्नीमः, प्रसादयामः इत्यर्थः.
 मराठी अर्थ - हे वरुणा ज्याप्रमाणें रथाचा चालक (रथी: ) हा, [ फार चालून ] दमलेल्या ( संदितं ) अश्वाला [ गवत वगैरे चारून ] पुन्हां ताजातवाना करितो त्याप्रमाणें, आह्मांला सुख व्हावें ह्मणून (मूळ काय ) आह्मी तुझें मन स्तुतीनी ( गीर्भिः ) प्रसन्न करितों ( विसीमहि - विशेषेण बध्नीमः, प्रसादयामः इत्यर्थः ).
ऋचा ४ धीः-
 हि-हिशब्दः अस्मिन्नर्थे सर्वजनप्रसिद्धिं आह- ही गोष्ट सर्वप्रसिद्धच आहे कीं,
 मे-मम शुनःशेपस्य.
 विमन्यवः = कोधरहिताः बुद्धयः.
 परा पतन्ति = पराङ्मुखाः पुनरावृत्तिरहिताः प्रसरन्ति.
 वस्य इष्टये=वसीयसः अतिशयेन वसुमतः जीवनस्य प्राप्तये. वयः न = पक्षिणो यथा.
 वसती:- निवास स्थानानि, घरटीं.
 उप-सामीप्येन.
 घरट्यांसमीप ज्याप्रमाणें पक्षी प्राप्त होतात त्याप्रमाणे.
 मराठी अर्थ - ही गोष्ट कोणास सांगावयास पाहिजे असें नाहीं कीं, ज्याप्रमाणे पक्षी हे ( वयः ) आपल्या घरट्यांसमीप ( वसतीरुप ) प्राप्त होतात त्याप्रमाणें क्रोध रहित जें माझें मन तें ( विमन्यवः- क्रोधरहिताः बुद्धयः ), अतिशय धनानें युक्त अशा आयुष्याच्या प्राप्ती करितां ( वस्यइष्टये ), [ तुझ्या कडे ] पुन्हां परतण्याची इच्छा सोडून धांव घेतें (परापतन्ति. )