पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मराठी अर्थ - हे वरुणा, ज्याप्रमाणें [ ह्या जगामध्यें ] प्रजा ( विशः ) [ राजाचा एखादे वेळीं ] अपराध करिते त्याप्रमाणें जें कांहीं । यत् चित् हि ) तुझें कर्म ( ते व्रतं ) चुकीनें आह्मी दररोज विसरत असूं ( प्रमिनीमासे= प्रमादेन हिंसितवन्तः ) [तें कर्म तूं सांग करून घे, अध्याहृत. ]
ऋचा २ रीः-
 हत्नवे = हन्तुः पापहननशीलस्य तव संबंधिने ह्म० त्वत्कर्तृकाय [वधाय ], पाप्यांचा हन्ता ह्म० नाशक जो तूं त्या तूं केलेल्या. हें वधाचें विशेषण आहे.
 जिहीळानस्य = अनादरं कृतवतः .
 मा रीरधः=संसिद्धान् मा कुरु, विषयभूतान् मा कुरु, [ वधाचा आह्मांला ] विषय करूं नकोस.
 हृणानस्य= हृणीयमानस्य, क्रुद्धस्य [ तत्र ].
 मन्यवे = क्रोधाय .
 क्रोधाचाही आह्मांला विषय करूं नकोस.
 मराठी अर्थ - तुझा अनादर ह्म० उपमर्द करणारा जो मनुष्य त्याचा ( जिहीळानस्य ) वध करणारा जो तूं त्या तू केलेल्या ( हत्नवे ) वधाला ( वधाय ) आह्मांस ( नः ) पात्र करूं नकोस ( मा रीरधः ) [ आणि त्याचप्र- मागें ] जेव्हां तूं क्रोधयुक्त होतोस तेव्हां तुझ्या ( हृणानस्य ) क्रोधालाही ( म- न्यवे ) आह्मांला पात्र करूं नकोस.
ऋचा ३ री:-
 मृळीकाय=अस्मत्सुखाय.
 रथी: रथस्वामी, सारथि.
 अश्रं न अवं इव.
 संदितं=संम्यक् खंडितम्, दूरगमनेन श्रान्तं.
 यथा स्वामी श्रान्तं अश्वं घासप्रदानादिना प्रसादयति तद्वत्.