पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

द्राच्या निश्चल जलाचें चालन करून त्यामध्यें लाटा उत्पन्न करितात ) अश त्या मरुतांसह वर्तमान इ. इ.
ऋचा ९ वीः-
 त्वा त्वां प्रति.
 पूर्वपीतये = पूर्वकाले प्रवृत्ताय पानाय, तुझें सोमपान अगोदर प्रवृत्त व्हावें ह्मणून, तूं अगोदर सोमपान करावेंस ह्मणून.
 अभिसृजामि - सर्वतः संपादयामि.
 सोम्यं = सोमसंबंधिनं, सोमवल्लीचा.
 मधु = मधुरसं, मधुर असा रस.
 मराठी अर्थ - तुला सोमरसाचें पान अगोदर घडावें ह्मणून (पूर्वपीतये) तुझ्याकरितां (त्वा=त्वां प्रति ) मी सोमवल्लीचा ( सोम्यं ) मधुर असा रस (मधु) अगदी पुरेसा आणितों (अभिसृजामि ) [तर] मरुद्रणां सद्दवर्त- मान ! तूं ये.

मंडल १ सूक्त २५.


( पीटर नं. २ ).


ऋचा १ लीः-
 यत् चित् हि-यदेव किंचित् [ व्रतं ].
 ते तव संबंधि
 विशः प्रजाः.
 व्रतं कर्म.
 प्रमिनीमसि = प्रमादेन हिंसितवन्तः.
ह्याच्यापुढे “ तदपि व्रतं प्रमादपरिहारेण सांगं कुरु " हें वाक्य अध्याहृत घ्यावें.
 द्यविद्यवि = प्रतिदिनं,