पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 दिवि= द्युलोके.
 देवासः = स्वयमपि दीप्यमानाः .
 मराठी अर्थ-जे स्वतः दीप्तिमान असून ( देवासः ) दु:खरहित अशा सूर्याच्या ( नाकस्य ) वर असलेल्या ( अधि ) दीप्तिमान् अशा ( रोचने द्यु- लोकामध्यें दिवि ) वास करितात (आसते) अशा त्या मरुतांसहवर्तमान इ. इ.
ऋचा ७ वीः-
 ईंखयन्ति=चालयन्ति, चळवितात, हलवितात.
 पर्वतान्-मेघान्.
 तिरः=तिरस्कुर्वेति निश्चलस्य जलस्य तरंगायुत्पत्तये चालनं तिरस्कारः
 समुद्र सागरं.
 अर्णवं=उदकयुक्तं हें “समुद्रा" चें विशेषण.
 मराठी अर्थ - जे मेघांना ( पर्वतान् ) इकडे तिकडे हलवितात ( ईंख- यन्ति) [ आणि त्याचप्रमाणें ] जे उदकयुक्त अशा (अर्णवं ) समुद्राचा (समुद्र) तिरस्कार करितात ( तिरः = तिरस्कुर्वन्ति ह्म० समुद्राच्या निश्चल अशा जलाचें चालन करून त्यामध्यें लाटा उत्पन्न करितात ) अशा मरुतांसहवर्तमान इ. इ.
ऋचा ८ वीः-
 आतन्वन्ति=आप्नुवन्ति, व्यापून टाकितात (अर्थात् आकाशाला ).
 रश्मिभिः=सूर्य किरणैः.
 तिरः तिरस्कुर्वन्ति.
 ओजसा - स्वकीयेन बलेन,
 मराठी अर्थ -- जे सूर्यकिरणांच्या योगानें ( रश्मिभिः ) [ आकाश, अध्या. ] व्यापून टाकितात ( आतन्वन्ति ) [ आणि ] आपल्या सामर्थ्याने (ओ- जसा ) समुद्राचा ( समुद्रं ) तिरस्कार करितात ( तिर:- तिरस्कुर्वन्ति ह्म० समु-