पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महः महतः. ह्याचा अन्वय " तव " बरोबर करावा - महस्तव.
 क्रतुं कर्मविशेषं, यज्ञादि कर्म. ह्यापुढें "उल्लंघ्य” हें अध्याहृत आहे. त्वत्सं- बंधी यज्ञादि कमांचे उल्लंघन करून ह्म० त्वत्संबंधी यज्ञादि कर्मे झाली नाहींत तर.
 पर: उत्कृष्टः ह्यापुढें " भवति " हें अध्याहृत आहे. " उत्कृष्टो नहि भवति " म० मान देण्याला योग्य होत नाहीं.
 ये मनुष्यास्त्वदयं ऋतुं अनुतिष्ठन्ति ये च देवाः त्वदीये क्रतौ इज्यन्ते ते एव उत्कृष्टाः इत्यर्थः .
 मराठी अर्थ - श्रेष्ठ जो तूं त्या तुझ्यासंबंधी (महस्तव) कम जर झाली नाहींत तर ( ऋतुं उल्लंघ्य – उल्लंघ्य हें अध्याहृत ) देव किंवा मनुष्य ( मर्त्यः ) [ कोणीही ] खचित मान्यतेस पोचत नाहीं. [ ह्मणून ] मरुतांसह वर्तमान इ. इ.
ऋचा ३ री:-
 महः - महतः ह्याचा अन्वय " रजसः " बरोबर.
 रजसः=उदकस्य. ह्या शब्दापुढे “ वर्षणप्रकार " हें पद अध्याहृत आहे. उदकाचा वर्षणप्रकार.  विदुः = [जे] जाणतात.
 विश्वे =सर्वे.
 देवास : द्योतमानाः ; विशेषण.
 अहः = द्रोहरहिताः; द्रोहरहित कां तर पर्जन्यवृष्टि करून प्राणिमात्रांवर उपकार करितात ह्मणून.
 मराठी अर्थ - जे महान् ( महः ) अशा उदकाचा ( रजसः ) [ वर्ष- णप्रकार, अध्या० ] जाणतात ( विदुः ), जे तेजस्वी आहेत ( देवासः ) [व] ज्यांचे ठिकाणीं द्रोहबुद्धि नाहीं ( अद्रुहः ) असे जे सर्व ( विश्वे ) [ मरुत् नांवा- चे देव ] त्यांसहवर्तमान इ० इ०