पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मंडल १ सूक्त १९.

ऋचा १ ली:-

( पीटर० नं० १ )



 प्रति = प्रतिलभ्य, प्राप्त होऊन, स्वीकार करून.
  त्यं =तं, तथाविधं, त्यच्छद्वः सर्वनाम । तच्छब्दपर्यायः,
 चारुं=अंगवैकल्यरहितं, सांगोपांग सिद्धीस नेलेला.
 अध्वरं = यज्ञं.
 गोपीथाय = सोमपानाय.
 प्रहूयसे = प्रकर्षेण हूयसे, मोठ्या आस्थेनें बोलविला जात आहेस.
 मरुद्भिः = देवविशेषैः सह, मरुत् नांवाच्या देवांसहवर्तमान, मरुद्गणांसह.
  आगहि=आगच्छ.
 मराठी अर्थ - अंग-उपांगांसहित सिद्धीस नेलेल्या ( चारुं ) त्या तशा प्रकारच्या (त्यं ) अध्वराचा ह्म० यज्ञाचा स्वीकार केल्यावर ( प्रति प्रतिलभ्य ) सोमपानाकरितां ( गोपीथाय ) आम्ही तुला मोठ्या आस्थेने बोलावीत आत (प्रहूयसे ), [ तर ] मरुतांसह हे अग्ने ! तूं ये.
 यास्कांनीं ह्या ऋचेचें स्पष्टीकरण येणें प्रमाणें केलें आहे- अंग- उपांगास- हित पूर्णतेस नेलेल्या ( चारुं ) त्या तशा प्रकारच्या (त्यं ) अध्वराप्रत झ० यज्ञाप्रत ( अध्वरं प्रति ) सोमपाना करितां ( गोपीथाय ) तुला मोठ्या आस्थेने आह्मी बोलावीत आहोंत ( प्रहूयसे ) [ तर ] इ०.
 " प्रति " ह्या पदासंबंधानेंच सायणांच्या व यास्कांच्या स्पष्टीकरणामध्यें भेद आहे.
ऋचा २री:-
 नहि न खलु.
 मर्त्यः=मनुष्यः.