पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



उदा० – अग्निमीळे पुरोहितम्, तस्माद्विराळजायत, मृळा सुक्षत्र मृळय, पळुर्वीरेकमिद्वृहत्.
 (१४) " य:ह्या, सर्वनामाच्या रूपाबद्दल " यत् " त्या रूपाचाच प्रयोग कित्येक ठिकाणीं केलेला असतो. उदा० - महो रायो ! राधसो यद्ददन्नः ( यत् ददत् = यः प्रायच्छत् ).
 (१५) "देव" हा शब्द वेदांत विशेषणार्थीही असतो. उदा०-मित्रो देवेष्वायुषु जनाय वृक्तबर्हिषे इष इष्टत्रता अकः ( देवेषु आयुषु - द्योतमाना- दिगुणयुक्तेषु मनुष्येषु.)
 (१६) भूतकाळाचें भाषान्तर वर्तमानकाळामध्ये बऱ्याच स्थळीं करावें लागतें. उदा०-मध्या कर्तोर्विततं संजभार ( संजभार = उपसंहरति ); अभि यो महिना दिवं मित्रो बभूव सप्रथाः ( अभिबभूव = अभिभवति. )
 ( १७ ) वेदामध्यें " न " चा अर्थ पुष्कळ ठिकाणीं “ इव असा असतो. उदा० - रथीरवं न संदितं ; वयो न वसतीरुप; ऐनं गच्छन्ति समनं न योषाः.
 ( १८ ) “ न ” चा उपयोग पादपूरणार्थही केलेला वेदांत होत्तीस येतो. उदा० - सं यन्नृन् न रोदसी निनेथ. “ न " चा पादपूरणार्थ प्रयोग यास्कांना संमत असून त्यांनी “ दुर्मदासो न = दुर्मदासः " हैं उदाहरण दिलें आहे. "" न ” चा पादपूरणार्थ प्रयोग मानिल्यास ९३ पानावर प्रदर्शित केलेले “ न " चें कोडें सुबोध होतें.
 १९ ) वेदामध्यें भूतकाळाला " अ " ची गरज असते असें नाहीं. - ब्रह्माण्येषां शृणुतं हवीमनि ( शृणुतं = अशृणुतं ).
 ( २० ) " तत् " ह्याचा प्रयोग " तेन " ह्या अर्थी केलेला आढळतो. उदा०—उत स्वया तन्वा संवदे तत् ( तत्-तेन वरुणेन सह . )