पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सौ असुतृपौ उदुम्बलौ यमस्य दूतौ चरतो जनाँ अनु. ह्यांत शब्दांची विशेषणें एका पाठीमागून एक, उभयान्वयी अव्ययांचा उपयोग न करितां, घातलेली आहेत.
 ( ६ ) वेदामध्यें द्वन्द्वसमासांतील प्रत्येक शब्दाचेंही द्विवचन केलेले आढळते. उदा०-- इन्द्रावरुणा, द्यावापृथिवी. केव्हां केव्हां द्वंद्व समासांतील पदें एकमेकांपासून तोडलेलीही आढळतात. उदा० - प्र द्यावा शोचिः पृथिवी अरोचयत्. येथे “ द्यावापृथिवी" असें संयुक्त पद पाहिजे होतें.
 (७)वेदांमध्ये क्रियापद एकीकडे व त्याचें उपपद एकीकडे असें घाल- ण्याचा प्रघात दिसतो. उदा०-३ -अभि त्वा पूर्वपीतये सृजामि सोम्यं मधु ( अभिसृजामि ), प्रद्यावा शोचिः पृथिवी अरोचयत् (प्रारोचयत्), आ शुभ्रा यातमश्विना ( आयातम् ).
 ( ८ ) " सः + इति" ह्यांचा संधि " सेति " असाही केलेला असतो. उदा०यं स्मा पृच्छन्ति कुछ सेति घोरं.
 ( ९ ) वृत्ताकरितां अक्षरें दीर्घ केलेली दृष्टीस पडतात उदा० -यं स्मा पृच्छन्ति, निरंहसः पिष्टता निरवद्यात्, इमं मे वरुण श्रुधी हवमद्या च मृळया, स्वावेशो अनमीवो भवा नः, अच्छा वो देवीमुपसं, प्रभूती पूरुषत्वता.
 (१०) “ए” अथवा “ ओ " ह्यांच्यापुढे येणाऱ्या "अ" च्या लोपा- लोपाविषयी व " ऊं” विषयीं विचार अन्य ठिकाणी केलाच आहे.
 (११) विसर्गाचा लोप केलेलाही आढळण्यांत येतो. उदा० - पृच्छे तदेनो वरुण दिदृक्षु उपो एमि चिकितुषो विष्पृच्छम् ( दिदृक्षु = दिदृक्षुः ).
 ( १२ ) " उपो", "अथो " अशी रूपें वेदांत आढळतात. उदा०- उपो एमि चिकितुषो विपृच्छम्; स जाता अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः.
 (१३) "ळ" हैं अक्षर अर्वाचीन संस्कृतांत नाहीं, पण तें वेदांत आहे.