पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
कांही लक्ष्यांत ठेवण्यासारख्या गोष्टी.
_________:0:_________

 ( १ ) छान्दसो मलोपः - वेदामध्यें "म" चा लोप केलेला आढळतो. उदा० - अभि यो महिना दिवं मित्रो बभव सप्रथाः त्यांत “महिना " या शब्दाबद्दल " महिना ” असें घातलें आहे.
 ( २ ) षष्टीकरितां द्वितीया, पंचमी करितां चतुर्थी, द्वितीयेकरितां षष्टी, ह्याप्रमाणे एका विभक्तीकरितां दुसच्या एकाद्या विभक्तीचा प्रयोग केलेला वेदांत आढळतो. उदा०—– युवां नरा पश्यमानास आप्यं ( युवां युवयोः, षष्ठयर्थे द्वितीयां ); न्यत्रये महिष्वन्तं युयातं ( अत्रये = अत्रेः, पंचम्यर्थे चतुर्थी ); महो रायो राधसो यद्ददन्नः ( महो राधसो रायः = राधकं मद्दत् धनं, द्वितीयार्थे षष्टी ).
 ( ३ ) वेदांतील स्त्रीलिंगी सप्तमीचीं व तृतीयेची रूपें लौकिक संस्कृताहू भिन्न असतात. उदा० - नाभा पृथिव्या भुवनस्य मज्मना ( नाभा = नाभौ ); अचित्ती यच्च्त्रकृम दैव्ये जने दीनैर्दक्षैः प्रभूती पुरुषत्वता (अचित्ती=अचित्त्या, प्रभूती=प्रभूत्या, पुरुषत्वता = पुरुषत्वतया ).
 (४) वेदांतील पुल्लिंगी द्विवचनें व नपुंसकलिंगी अनेकवचनेंही ध्यानांत ठेवण्यासारखीं आहेत. उदा० - आ शुभ्रा यातमश्विना स्वश्वा ( शुभ्रा = शुभ्रौ, अश्विना=अश्विनौ, स्वश्वा = स्वश्वौ ); छन्दांसि सर्वा ता यम आहिता (सर्वा= सर्वाणि, ता=तानि, आहिता = आहितानि ).
 (५) वेदामध्यें " आणि " " व " इत्यादि शब्दांचे समानार्थक " च " वगैरे शब्द पुष्कळ ठिकाणी अवश्यक असतांही गाळलेले असतात. ह्या पुस्तकांत [ ] अशा कंसांत जे शब्द घातले आहेत त्यांपैकी बरेचसे अशा प्रकारचे आहेत. उदा० - यौ ते श्वानौ यम रक्षितारौ चतुरक्षौ पथिरक्षी नृचक्षसौ; उरूण-