पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४ - देवो न संविता । ऊर्ध्वो बाजेस्व सनिता यदञ्जिभिर्वाद्यद्भिर्विय महे ॥; ते न॑स्त्रध्वं तेवत, त उ॑ नो अधि' वोचत । मा नेः पथः पित्र्यन्मानवादि दुष्ट परावर्तः ॥ बृहतीचाच सतोबृहती ह्मणून एक भेद आहे. त्यास सतो बृहती ह्मण- "ण्याचे कारण असें आहे की त्याचे पहिले दोन चरण आणि दुसरे दोन वरण हे एकसारखे असतात. पहिला आणि तिसरा जगती छंदाप्रमाणें व दुसरा आणि चवथा हे गायत्रीप्रमाणें ह्मणतां येतात. उदा०-- नहि वः शत्रुर्विविदे अधि द्यवि न भूम्यां रिशार्दसः । युष्माकं- - मस्तु॒ तवि॑षि॒ तना॑यु॒जा, रुद्रसोनू चि॑िद॒धृषे ॥. पंक्ति छंदाची रचना सुलभ आहे. अनुष्टुभ् छंदास आणखी पांचवा पाद अनुष्टुभाचाच जोडल्यास पंक्ति छंद होतो. उदा० - अधि सानौ निर्जिघ्नते, वज्रेण शतपर्वणा । म॒न्दा॒न॒ इन्द्रो॒ अन्ध॑सः सखिभ्यो गातुमिच्छत्यर्चन्ननु॑ स्व॒राज्य॑म् ||; सु॒स॒न्दृशं' त्वा व॒यं मर्धवन्वान्दिषमहि' । प्रनूनं पू॒र्णव॑न्धुरः, स्तु॒तो या॑हि॒ वश अनु, योजा वि॑िन्द्र ते॒ हरीं' II. येथपर्यंत ऋग्वेदांतील प्रसिद्ध छंदांचं विवरण झाले. ह्याशिवाय दुसरी मनोरंजक व चमत्कारिक वृत्तें ऋग्वेदांत पुष्कळ आहेत, परंतु आतां ज्यास्त विवेचन विस्तारभयास्तव करितां येत नाहीं. छंद हे वेदरूपी पुरुषाचे चरण होत असें शिक्षेत सांगितलें आहे. तेव्हां प्रथम ह्या अद्वितीय गुरुषाच्या चरणसहवासाकडे यत्किंचितही प्रवृत्ति झाली अस- तां श्रमाचें साफल्य होईल,