पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२

दोहोंसही हे छंद फार अनुकूल असल्यामुळे वेदांतील पुष्कळ सुंदर सूकें ह्या छंदांत झालेली आहेत.
 त्रिष्टुभ् छंदास चार चरण असून चरणांत अकरा अक्षरें असतात अस सामान्य नियम आहे. त्या छंदांतील ८ वें अक्षर दीर्घ असतें आणि शेवटची तीन अक्षरें "य" गणान्त असतात. उदा० -
 अनश्वो जा॒तो अ॑न॒भीशुरर्वा, कनिक्रदत्पत यदूर्ध्व सोनु । अ॒चित्तं॒ ब्रह्म॑ जुजुषुर्युवा॑न॒ः, प्रमित्रे धाम वरु॑ण गृणन्तः ॥; कथा ते' अनेआयो- दार्वाजे भिराशुषाणाः । उभे यत्तोके तन॑ये दधा॑ना ऋ॒तस्य॒ साम॑त्र॒णय॑न्त देवाः ॥; ये पायवो' मामतेयं ते', अग्ने॒ पश्य॑न्तो अ॒न्धं दु॑रिता द॑रक्षन् । ररक्ष तान्सुकतो' विश्ववे॑दा, दिप्स॑न्त॒ इद्रपवो॒ नाई देभुः ॥; न स स्वो दक्ष' वरुण श्रुतिः सा, सुरा॑ म॒न्युर्विभाद॑को॒ अचित्तिः । अस्ति ज्यायान्कन यस उपारे, स्वप्र॑श्चनेदर्नृतस्य प्रयोता ॥; सत्या सत्येभिर्महती म॒हद्भि॑र्दे॒वी दे॒वेभि॑र्य॑ज॒ता यज॑त्रैः । रुजवृ॒हानि॒ दद॑द॒स्रिया॑णा॒ प्रति॒ गव॑ उषसे वावशन्त ॥; स दक्षि॑णा॒ दक्षि॑पतिर्बभूव, अञ्जति॒ यं दक्षिणतो इर्विभिः । त्रिष्टुभ् छंद उपजाति वृत्तास फार जवळ आहे.
 दुसरा महत्त्वाचा छंद जगती हा होय. ह्याचें लक्षण असें आहे कीं, ह्यास चार चरण द्वादशाक्षर असून चरणांतील शेवटचीं तीन अक्षरें "र" गणा-त्मक असतात.
 -हस्वदीर्घात थोडा विपर्यय केला असतां जगती छंद वंशस्थ वृत्ताप्रमाणें वाचतां येतो. जगती छंदाचीं उदा०--
अस्माकं देवा उभर्याय जन्मने,शर्म॑ य॒च्छत द्विपदे चतु॑ष्पदे । तद॒स्मे शं योर॑र॒पो द॑धातन ॥; यु॒वं वन्द॑नं॒