पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११

 अनुष्टुभ् छंदांत चार चरण असून प्रत्येक चरणांत आठ अक्षरे असतात त्रि॒पादू॒र्ध्व उदै॒त्पुरु॑ष॒ः पादा॑स्य॒हाभ॑व॒वत्पुन॑ः । ततो॒ विष्व॒ व्य॑क्रामत्—साशनाः- नशने अभि ॥; तस्मा॑द्वराळजायत, विराजो अधि पूरु॑षः । स जातो अत्य॑रिच्यत प॒श्चाद्भूमि॒मथो॑ पु॒रः ॥; अग्नी॑षोमावि॒मं सु॒मे शृणुतं वृ॑षणा॒ हव॑म् । प्रति॑ नि॒ हृतं भव॑तं दाशुषे मर्यः ॥
 विराट्र छंदाचा पाद दहा किंवा अकरा अक्षरांचा असतो. ह्या छंदाचे एकपक्ष व द्विपदा, असे आणखी दोन भेद आहेत. एकपदा छंदामध्ये एकच • चरण व द्विपदेत दोन असतात. त्रिपदा विराट्ही असतो.
 एकपदा विराट्र-भद्रं नो' अपिवातय मर्नः.
 द्विपदा विराट् छंदांतील सातवें, अन्त्य आणि उपान्त्य अशी तीन अक्षरें दीर्घ असतात. ऋग्वेदांत बहुशः दोन द्विपदा मिळुन एक ऋचा केलेली आढळते. उदा०—स हि क्षपावो॑ अ॒ग्नी रयीणां, दाशयो अ॑स्मा॒ अरं' सूक्तैः ॥ ए॒ता चि॑िकित्वो॒ भूमा॒ नि पहि, दे॒वानां॒ जन्म मर्तींश्च विद्वान् ॥; आदित्ते॒ विश्वे ऋतुं जुषन्त, शुष्कायद्देव जीवो जनिष्टाः । भजन्त विश्वे देवत्वं नार्म, ऋतं सप॑न्तो अ॒मृत॒मे॒र्वै': ।.
 त्रिपदा विराट् छंदांत अकरा अक्षरांचे तीन पाद असतात. उदा०- स यो वृषां नरां न रोद॑स्योः, श्रवोभिरस्ति जीवपीतसर्गः । प्र यः स- स्राणः शिश्रीत योन। II; अभि द्विजन्मा त्री रोचनानि, विश्वाि अ॑स्थात् । होता यजि॑ष्ठो अपां सधस्थे ॥; आ शुभ्रा यातमश्विना स्वश्वा ग दस्रा जुजुषाणा युवाको ': । हवानि' च प्रतिभृता बीतं नः ॥.
 अनुष्टुभाशिवाय लौकिक संस्कृत वृत्तांशी बऱ्याच अंशी साम्य पावणारी वैदिक वृत्तें त्रिष्टुम् व जगती हीं होत. शब्दालंकार आणि अर्थोदात्तता ह्या