पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०

नव्हत. ह्या वृत्तांत सुमारे सहासात वृत्तें मूळचीं असून बाकीची सर्व त्यांच्या भिन्नभिन्न भागांच्या एकीकरणापासून उत्पन्न झालेली आहेत. जीं सात मुख्य वृतें आहेत ती अक्षरापासून निर्माण झाली असें ऋग्वेदांत सांगितले आहे. ( अक्षरेण मिमते सप्त वाणी : १. १६४. २४). ह्या सातांपैकी गायत्री, त्रिष्टुम् आणि जगती ह्यांचा भरणा ऋग्वेदांत फार आहे. या तिहींची नावें ऋग्वेदांत एका ऋचेंत आली आहेत (१. १६४. २३). ह्या महत्त्वाच्या वृत्तांचीच रचना मुख्यत्वेंकरून पुढें दिली आहे.
 ऋग्वेदांतील प्रथम वृत्त गायत्री हें होय. हे वृत्त अतिशय साधें परंतु मनोहर आहे. ऋग्वेदाचा बराच भाग गायत्री वृत्तबद्ध असून ब्राह्मणांच्या ब्राह्म- णत्वाचें सर्वस्व आणि अखिल वेदांची माता ह्मणून जो मंत्र विख्यात आहे तोही गायत्री छंदांतच आहे.
 गायत्री छंदाचे तीन पाद असून प्रत्येक पादांत आठ अक्षरे असतात व साहावें अक्षर प्रायः दीर्घ असतें. उदा० - अभिर्माळे पुरोहि॑तं य॒ज्ञस्य॑ दे॒वमृ- त्विज॑म् । होता॑रं रत्नधात॑मं ॥; अग्ने॒ यं य॒ज्ञम॑ध्वरं विश्वतः परिभूरसि । स इ॒ह॒वेषु॑ गच्छति ॥; स नो॑ विश्वाहा॑ सु॒क्रतुं - रादि॒त्यः सुपर्धा करत् । प्रण आषि तारिषत् ॥ सातवें अक्षरही कांहीं थोड्या ठिकाणीं दीर्घ असतें परंतु असे पाद बहुतकरून अपुरे असतात.
 कथा रार्धाम सखायः, स्तोमं' मित्रस्यर्यम्णः । महि स्परो वरुणस्य ||; चतुरेश्चिद्दर्दमाना, द्विभीयादा निर्धातोः । न दु॑रु॒ताय॑ स्पृहयेत् ॥. ह्या दुसया ऋचेच्या 'दुसऱ्या पादांत सात अक्षरें आहेत. तसेंच “अर्था ते अन्त॑मानां, विद्यामं सुमतीनां । मा नो अति' ख्य आग॑हि ॥ " ह्या ऋचेत पहिल्या दोन पादांत सातसात अक्षरे आहेत,