पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व चवथा असे दोन चरण बारा अक्षरांचे असून बाकीच्या दोहोंत प्रत्येकी अकरा अक्षरें आहेत. तेव्हां २ व ३ हे चरण अनियत आहेत असें समजून श्रवेच्या छंदास द्वादशाक्षर छंदाचें नांव द्यावे.
 विभुः प्रभुः प्रथमं मेहनवतो, बृहस्पतेः सुविदत्राणि राज्येः । इमा सा- सानि वेम्यस्य वाजिनो, येम जर्ना उभये भुञ्जते विशः ॥ ह्यात प्रथम आणि चतुर्थ चरणांत बारा अक्षरें आहेत व द्वितीय आणि तृतीय चरणांमध्यें एकेक अक्षर कमी आहे; तरी पूर्वी लिहिल्याप्रमाणें ह्या ऋचेची गणना द्वादशाक्षर छन्दोवृत्तांत केली पाहिजे.
 "मो षु णः परोपरा, निर्ऋतिर्दुहणावधीत् । पदीष्ट तृष्णया सह ||" आणि ' यद्यूयं पृश्निमातरो॒ मर्तास॒ः स्यात॑न । स्तो॒ता वो अ॒मृत॑ः स्यात् || " ह्या दोन ऋचांमध्ये पहिल्या ऋचेच्या पहिल्या चरणांत सात व दुसऱ्या ऋचेच्या दुसऱ्या चरणांत सहाच अक्षरें आहेत. तथापि दोन्ही ऋचांत बाकीच्या प्रत्येक चरणांत आठ आठ अक्षरें असल्याकारणानें वरील ऋचांचा छंद अष्टाक्षर मानितात. त्याचप्रमाणें “ अपां नपा॑त॒मव॑से, स॒वि॒ितार॒मुप॑स्तु॒हि । तस्य॑ व्र॒तान्यु॑श्मास || ' येथे शेवटल्या चरणांतील संधीचा विश्लेष करून " व्रतानि उश्मसि " असें टल्यास सर्व चरणांत आठ अक्षरें भरतात. येणेंप्रमाणे छंदाच्या व्यवस्थेचें दिग्दर्शन आहे.
 छंदांच्या नांवावांचून आतां लिहिण्यासारखा महत्वाचा भाग राहिला नाहीं. वैदिक ऋचांत गणांचा प्रायः नियम नाहीं हें वर लिहिलेच आहे. तेव्हां वैदिक छंदांचा निर्णय शास्त्रकारांनीं ऋक्पादांतील अक्षरसंख्या आणि कांहीं विशिष्ट स्थानच्या अक्षरांचे हस्वत्व किंवा दीर्घत्व त्या आधारावर केलेला आहे.
 वैदिक छन्दःशास्त्र पिंगलमुनिप्रणीत आहे. ऋग्वेदांत निरनिराळ्या सुमारे ७५ वृत्तांचा अथवा छंदांचा उपयोग केला आहे. परंतु हीं सर्व वृत्तें