पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विणान्याशत ॥ " ह्यांत प्रथम पादांत अधिक झ० बारा अक्षरें आहेत व दुसन्या पादांतील यण संधि विश्लिष्ट केल्यास त्यांतही बारा अक्षरें होतात. “ सोमो' धेनुं सोमो अर्वन्तमाशु, सोमो' वीरं कर्मण्यं ददाति । सादन्य' विदथ्य' सभेयं', पितृश्रव॑णं यो ददा॑शदस्मै ॥" ह्या ऋचेत २ व ३ ह्या चरणांत, १ व ४ ह्या चरणांपेक्षां अक्षरें कमी आहेत, ह्मणून ते अपुरे व अनियत आहेत. पूर्ण पादांत भकरा अक्षरें असल्यामुळे हें ११ अक्षरांचे वृत्त आहे. “ अध॑ स्व॒नादु॒त बिभ्युः पतत्रिणो', द्रव्सा यत्ते' यवसादो व्य॑स्थिरन् । सुगं तत्ते तावकेभ्यो रथेभ्योऽ स॒ख्ये मा रि॑षामा॒ व॒यं तव॑ ॥ " येथे पहिल्या पादांत बारा अक्षरें उघड आहेत. दुसन्या पादांत "वि अस्थिरन् ” असा पदच्छेद केल्यास, व चवथ्या पादारं- भांचा लुप्त "अ "कार पूर्ववत् वाचल्यास त्या दोन्ही चरणांतही बारा अक्षरें येतात. तिसरा पाद मात्र एका अक्षराने अपुरा असल्यामुळे अनियत आहे. तेव्हां हाही छंद द्वादशाक्षर आहे.
 “उ॒त न॑ इ॒ त्वष्ठा ग॒त्वच्छा, स्मसूरेभि॑रभिपि॒त्वे स॒जोषा॑ः । आ वृत्रहे- न्द्र॑श्चर्षणि प्रा-स्तु विष्ट॑मो न॒रां न॑ इ॒ह ग॑म्याः ॥ ह्या ऋचेचा छंद एकादशाक्षर आहे. ती अक्षरें २ ऱ्या आणि ४ थ्या चरणांत मात्र स्पष्टपणे दृष्टीस पडतात. परंतु पहिल्या आणि तिसऱ्या चरणांतील पदांच्या संधींचा व्यवच्छेद केला असतांही त्यांच्यामध्यें भकरा अक्षरांची भरती होत नाहीं. ( जसें-उत ने ई त्वष्टा गन्तु अच्छा आ वृत्रहा इन्द्रः चर्षणि प्राः ). तथापि असे असमग्र आणि अनियत चरण संपूर्ण चरणाप्रमाणें मानिले जातात हें लक्ष्यांत ठोवले पाहिजे, असें वर निर्दिष्ट केलेच आहे.
 “ तन्नो॒ वातो' मयोभु वा॑तु॒ भेषजं, तन्मा॒ता पृथिवि तत्पिता यौः । तद्भार्वाणः सोम॒सुतो' मयोभुव - स्तद॑श्विना शृणुतं धिष्ण्या युवम् ” ॥ येथें पहिला