पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोणता हे समजणे फार दुर्घट असावें असें सकृद्दर्शनी वाटते. अक्षरांची व नियतगणाभावाची अडचण पुष्कळ अंशी खरी आहे, परंतु ती अपरिहार्य नाहीं. ऋचांच्या तिन्ही पादांत जरी कदाचित् कमजारत अक्षरें असली तरी निदान एका पादांत तरी तीं छंदाच्या नियमानुसार असतात. त्यामुळे ज्यांच्या चरणां- तील अक्षरें सारखी असावीत असा नियम आहे अशा ऋचांचा छंद ओळखकरितां स्थूल मानाने खाली लिहिलेल्या उपायाची योजना केली असतां छंद ओळखून काढितां येतो. हीं समाक्षर वृत्ते एकदा चांगली अवगत झाली म्हणजे जी मिश्र वृत्ते आहेत ती सहज निश्चित करितां येतील.
 संधींचा विच्छेद वगैरे प्रथम कांहीएक न करितां संहितेतील ऋचेच्या प्रत्येक पादांतील अक्षरें मोजून पहावीं. (१) न्यून चरणांतील अक्षरें संधीमुळे कमी झालेली नसून (२) त्यांतील अक्षरांची संख्या व त्याची रचना एकाद्या भिन्न छंदास अनुसरून नसल्यास, ज्या पादति किंवा चरणांत सर्वांपेक्षा ज्यास्त अक्षरें असतात तो पाद प्रायः त्या ऋचेच्या छंदाचा निदर्शक असतो. परंतु संधीमुळे पाद न्यून झालेला नसून इतर कोणत्याही छंदाच्या नियमानुरूप नस- ल्यास तो अनियत आहे असें समजावें. अथवा न्यून चरणांत यण्संधि किंवा लुप्त ‘“अ”कार वगैरे असल्यास तो पूर्ववत् करून अक्षरसंख्येचा मेळ बसवून पहावा.
 समाक्षर छंदांचे न्यून पाद दुसऱ्या एकाद्या पृथक् छंदास अनुसरून अस- ल्यास ती ऋचा मिश्र छंदाची असते. परंतु संदिग्ध छंद त्रैष्टुभ आणि जागत पादांच्या परस्परमिश्रणाशिवाय उत्पन्न होण्याचा संभव नाहीं, तेव्हां सामान्यतः • जास्त अक्षरांच्या चरणावरून ऋचेचा छंद निश्चित करण्याचा प्रयत्न करावा.
" स नो' रेवत्संभिधानः स्वस्तये । सददस्वात्रयिमस्मासु दीदिहि ||” येथें दुसन्या चरणांत पहिल्यापेक्षां ज्यास्त ह्मणजे बारा अक्षरें असल्यामुळे हा बारा अक्षरांचा छंद आहे. तसेच, " अभि स्वरों निषदा गा अवस्यव । इन्द्रे' हिन्वाना