पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्रुतीतील छंदांचा तिसरा विशेष असा आहे कीं, त्यांत पादांतील अक्षरां- चा नियम आहे तितकाही त्यांतील गणांचा नाहीं. ह्यामुळे लौकिक संस्कृतांतील वृत्तांच्या चालीवर ह्मणतां येतील अशा समग्र ऋचा श्रुतींत फार क्वचित् सांपड- तात. कांहीं ऋचांचे एक किंवा दोन पाद मात्र आधुनिक वृत्ताप्रमाणें ह्मणतां येतात. जसें - हिरण्ययवां पवर्यः प्रुषायन् मध्वः पिबन्ता उषसः सचेथे ||;अमीय ऋक्षा निहितास उच्चा नक्तं ददृश्रे कुई चिद्दिवे युः ॥; हिरण्यगर्भः समं वर्तताग्रे भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक॑ आसीत् ॥; प्र॒जाव॑द॒स्मे दिधिषन्तु॒ रत्न॑म् II; पि॒श॑ग॑रूप॒ः सद॑नानि॒ गभ्याः ॥ ; प्रनू स मर्तः शव॑सा जनाँ अति' तस्थौ व ऊती म॑रुतो॒ य॒माव॑त ।।; याभि'ः शुच॒न्ति ध॑न॒ससु॑षं॒सद॑म् इ०.  गणांच्या अनियतत्वामुळे येणारी विषमता हैं वैदिक ऋचांचें सामान्य स्वरूप होय. ही विषमता प्रायः ऋक्पादाच्या प्रथम भागांत असते. उदा०- या ते॒ धामा॑नि ह॒विषा॒ यज॑न्ति॒ ता ते विश्वा॑परिभूरस्तु य॒ज्ञम् । स्फान॑ः प्र॒तर॑णः सुवीरोऽवी' रहा प्रच॑रा सोम॒ दुर्यान् ॥; उ॒त ने ई म॒रुतो' वृद्धसेनाः स्मद्रोद॑सी सम॑नसः स॒दन्तु । पृष॑दश्वासोऽवन॑यो न रथा॑ रिशाद॑सो मित्रयुजो न देवाः ॥; अचि॑ित्त॒ यच्च॑कृ॒मा दे॑व्य॒ जने' दनैर्दक्षैः प्रभूती पूरुषत्वर्ता । देवेषु॑ च सवितर्मा- नु॑षेषु च त्वं नो॒ अत्र॑ सु॒वता॒ादना॑गसः ॥; कनिक्रदज्जनुषं प्रभुवाण इयर्ति वाचमरि- तेव नाव॑म् । सुमंगल॑श्च शकुने भवसि मा त्वा काचिदभिभा विश्य विदत् ॥; अर्वाङ् त्रिचको म॑धुवाहनो॒ रथो जीराश्रो' अश्विनोर्यातु सुष्टुतः । त्रिवन्धुरो मघवा॑ विश्वसैौभगः शं न आवेक्ष द्विपदे चतु॑ष्पदे ॥; पाहि नो अग्ने पायुभिरज स्त्रैरुत प्रिये सदन आर्श शुक्कान् ॥.
 ऋचांच्या चरणांत अक्षरें व गण ह्या दोहोंनाही नियम नाहीं, आणि कांहीं • ठिकाणी संधि अवश्यक व कांहीं ठिकाणी अनवश्यक असतो तेव्हां ऋचांचा छंद