पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुसऱ्या कोणत्याही तऱ्हेनें, तो भरून काढण्याविषयीं प्रयत्न न करण्याचा प्राति- शाख्यकारांनीं जो संप्रदायानुमत मार्ग स्वीकारला त्याचे कारण तरी पुष्कळ वैदिक ऋचा अनियत असतात हेंच होय. कांहीं आग्रही यूरोपिअन पंडितांच्या मतात्र- माणे शब्दांचे स्वाभाविक स्वरूप उच्छिन्न झालें तरी हरकत नाही. परंतु ऋक्पा- दांतील विशिष्ट अक्षरसंख्या पूर्ण केलीच पाहिजे. हैं भ्रामक मत कोणीही समं- जस मनुष्य एक क्षणभरही कबूल करणार नाहीं. मग युक्तीस विरुद्ध, व्याकर- णास असंमत, व शब्दांच्या स्वाभाविक स्वरूपास विघातक अशा मार्गाचा अवलंब करून संप्रदायशुद्ध पाठ भ्रष्ट करण्यास प्रातिशाख्यकार तयार नसल्यास त्यांत आश्चर्य कसचें? ह्यावरून वैदिक ऋचांचा छन्दोनिर्णय करितांना पदांतील संधींचा नेहमींच विच्छेद करावा लागतो असें मात्र नाहीं. ऋग्वेदांतील ऋचांचे हजारों पाद असे सांपडतील कीं ज्यांमध्ये दोन पदांत संधि केल्यावांचून अक्ष- रांच्या विशिष्टसंख्येची निष्पत्ति होतच नाहीं; व दुसऱ्या पुष्कळ ऋचा अशा आहेत की ज्यांमध्यें पर्दे विभक्त केलीं असतांही अक्षरांची भरती होत नाहीं. अशा ऋचांपैकी थोड्या ऋचा वर दिल्याच आहेत. तेव्हां वैदिक ऋचांस संधि प्रतिकूल आहेत असा चुकीचा समज होऊं देतां कामा नये. संधींची अवश्य- कता असणाऱ्या ऋचांचीं कांहीं उदाहरणें येणेंप्रमाणे आहेत- देवी यदि तवि॑षी त्वा वृ॑धा॒तये' ( त्वा वृ॑धा+ऊ॒तये॑ ); आद॑स्पते ध्व॒सय॑न्ति॒ वृ॒धेरते ( वृथा+ इरते ) ; अभि स्रर्चः क्रमते दक्षिणावृतः ( दक्षिण+आवृतः ); अभीमृतस्य॑ दोहन अनूषत स्वेनैव धीरो मन॑सा यदप्र॑भीत् ( अभि+ईम् ), ( स्वेन॑+इव ); अपामुपस्थे विभृतो यदावसत् ( यत्+आ+अव॑सत् ); दिवानक्तं पलितो यु॒र्वाजनि ( युवा॑ +अजनि ); व्र॒जं च विष्णुः सखिवाँ अपोर्णुते (अप+ऊर्णुते ); आ॒भि व्रज॑द्भिर्व॒युना॒ नवा॑धित (नर्वा+अधित ); पिबेन्द्र सोमं वृषभेण भा- नुन ( पिबे+इन्द्र ).