पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ह्या त्रैष्टुम् पादातील अक्षरसंख्येच्या पूर्ततेकरितां वर्सल' चरणामधील अक्षरें "मा अपुरं " अशीं ह्मणावी लागतात. त्याचप्रमाणें “ भुवः सखा॑वृको वार्ज-साते " याचा " सखा अनुको " असा, " यस्य धाम श्रव॑से॒ नाम॑ न्द्रियं " याचा" नाम॑ इ॒न्द्रयं ” असा, “वि यो ममे रज॑सी सु॒क्रतू यया॒जरेभिः” इ० त्यांत "यया अजरे 'भिः " असा पदांतील संधींचा विश्विष्ट उच्चार करण्याचा परिपाठ आहे.
 वर लिहिलेल्या संधीखरीज आणखी ज्या एका प्रकारच्या संधीचा विसंयोग पादपूरणार्थ करणें भाग पडतें ते संधि क्षैप्रवर्णात्मक हे होत. मूळचे स्वर असून पढें असवर्ण स्वर आल्यामुळे त्यांचे ठिकाणी "य" वर्गातील ज्या वर्णांचा आदेश होतो, अशा "य", "व" इ० वर्णासच "क्षैप्रवर्ण” अशी संज्ञा प्रातिशाख्यांत दिलेली आहे. जे “य”, “व" इ० वर्ण स्वरस्थानचे आदेश नसून मूळचेच असतात त्यांस अर्थातच " स्वाभाविक” असें नांव आहे. तेव्हां ऋचेच्या पादां- तील न्यूनाक्षरसंख्येच्या परिसमाप्तीकरितां कांहीं ज्यास्त अक्षरांची अपेक्षा असेल तर पादांत पूर्वोक्त क्षैप्रवर्ण ( ह्म० दोन पदांमधील यण् संधि ) असल्यास त्यांचा, किंवा पदारंभींचा "अ" पूर्वीच्या " ए " अथवा " ओ " ह्या स्वरांत लुप्त झाला असल्यास त्या संधींचा विच्छेद करून त्यांतील मूळ स्व- रांचा अक्षरगणनेंत अन्तर्भाव करावा. जसें, "यस्य॑ त्रि॒तो व्योज॑सा वृ॒त्रं विप॑र्व मर्दयत्" ह्यांत "वि ओज॑सा" असें वाचावें लागतें. तसेंच, “त्वं ह्यग्ने दिव्यस्य राजसि,” “स चिकित्वां 'ईयते सान्वीयते, "आदिप्तश्वा बुबुधाना व्य॑ख्यन्, ""श्री णि जाना परि' भूषन्त्यस्य, " त्वं कुत्सं' शुष्णहत्येध्वाविधा -- र॑न्ध- योऽतिथिग्वाय शम्बरं, "" कृष्णास्व॑ने अरु॒षो विमहि, ३० ऋक्पादांत अनुक्रमे " त्वं हि अंग्रे, " सा नु ईयते,"वि अख्यन्" " पारे भूषन्ति