पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऋग्वेदास केवळ काव्यदृष्टीने पाहणे चुकीचे आहे. तत्रापि ऋग्वेदासारखा सर्व- मान्य ग्रंथ छंदोबद्ध असल्याकारणाने त्याच्या ह्या अंगाचेंही लक्षण व वर्णन करण्याचा शास्त्रकारांनी प्रयत्न केला आहे.
 ज्यामध्ये ओळीतील मात्रांची संख्या अथवा अक्षरांची संख्या आणि त्यांच्या योजनेसंबंधाच्या नानाप्रकारच्या रीति अगदी ठरीव असतात ते पद्य. ऋग्वेद हा पद्यात्मक आहे तरी त्यांतील पुष्कळ पद्यांची रचना अनियत अस- त्यामुळे आधुनिक पद्यांचे वरील लक्षण ऋग्वेदांतील ऋचांस अक्षरशः लागू पडत नाहीं. महाभारतांतील कांहीं पयांप्रमाणे एकाच पद्यांत अनेक वृत्तांचे चरण घातलेले आपणांस लौकिक संस्कृतांतही कोटें कोठें आढळतात. तथापि वृत्तांच्या चरणांतील अक्षरांची किंवा मात्रांची संख्या कमजास्त झालेली लौकिक संस्कृतामध्ये कधींही आढळणार नाहीं. ही स्थिति ऋग्वेदांत सर्वांशी जुळत 'नसली तरी ऋचांच्या पादांतील अक्षरांच्या संख्येस कांहीं नियम असल्याचें टोत्पत्ती येते. व हे नियम प्राय: पाळले गेले आहेत असें ह्मणण्यास कांहीं हरकत नाही. वैदिक व लौकिक ह्या दोन पद्यपद्धतीत अगखी एक भेद असा आहे की वेदोत्तरकालीन संस्कृत पद्यांत चरणांतील अक्षरसंख्येच्या पूर्ततेस त्यांतील संधीचा विश्लेष करण्याचा प्रसंग फार कचित् येतो. भर्तृहरीच्या कवि- तेंत व महाभारतांत असे कांहीं सुप्रसिद्ध अपवाद आहेत, परंतु संधिक्षम स्वर, संधि केल्यावांचून तसेच पृथक् असूं देणे, हा पद्यदोष मानिला आहे. वेदांवर हा दोष येऊ शकत नाही; ह्मणून वैदिक ऋचेच्या पादांत जितकी अक्षरें असा- वीत ह्मणून सामान्य नियम दृष्टीस पडतो तितकी अक्षरें न भरल्यास जितकी अक्षरें कमी पडतील तितक्या अक्षरांचे संपादन, अन्य पदाशी संधि झाल्या- मुळे लुप्त झालेल्या अक्षरांचा उच्चार व्यक्त करून, करावें लागतें. परंतु हा (नियम निरनिराळ्या पदांतील मात्र संधि, जरूर पडल्यास विश्विष्ट करण्या- विषय आहे हे पक्के ध्यानांत ठेविलें पाहिजे. जसे- “ नूनं विदन्मापरं सहस्वः *