पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैदिकवृत्तविचार.

 म य र स त ज भ न ल ग - संमितं भ्रमति वाङ्मयं जगति यस्य ।  स जयति पिङ्गलनागः शिवप्रसादाद्विशुद्धमतिः ॥ भाषेचें उत्कृष्ट स्वरूप काव्य हैं होय. ज्या भाषणांत किंवा लेखांत प्रसाद, रसवत्ता व उदात्तता हीं नजरेस येतात तीं भाषणें किंवा ते लेख काव्यरूप आहेत असें समजावें. सृष्टीतील ज्या ज्या रमणीय व उत्तम वस्तूंचा अनुभव घेण्याकरितां मन उत्सुक असतें त्या त्या रमणीय वस्तूंच्या प्रत्यक्षतेची प्रतीति करून घेऊन मनोवृत्तींस जागृत करण्याचे आणि चित्ताचे आकर्षण करण्याचे सामर्थ्य उत्तम काव्याचे मात्र अंगी आहे. जगांत एकवार जी एकादी अपूर्व गोष्ट घडते ती तशीच चिरस्थायी होण्याचं तर लांबच, परंतु देश, काल व व्यक्ति इत्यादिकांच्या संबंधाने तिच्याशी पूर्ण साम्य पावेल अशी दुसरी गोष्टही कधीं घडून येत नाहीं. तथापि चमत्कार असा आहे की एक काव्यच मात्र झालेला वृत्तांत पुनःपुन्हां बरोबर रीतीनें भासमान करूं शकते. यामुळे वस्तूचें प्रत्यक्षानुभवजन्य सुख जरी परिमित आणि नश्वर असले तरी काव्यार्पित झालेल्या वृत्तांतापासून उत्पन्न होणारे मुख अक्षय्य असतें व त्याचा अनुभव इजारों मनुष्यांस पाहिजे त्या ठिकाणी एकसमयावच्छेदेकरूनही घेतां येतो. ह्या योगानें रामचन्द्राचा किंवा अकिलाज व हेक्टर त्यांचा वृत्तांत आजपर्यंत लक्षा- चधि मनुष्यांस प्रत्यक्ष पाहतां आला. कान्पृच्छामः सुधास्वर्गे " ३० श्रीकांत जी काव्याची महती वर्णिली आहे ती उगीच नव्हे. पदलालित्य व छन्दो- बद्धता इ० ह्रीं काव्याचों बाह्यांगे होत. ऋग्वेदांत जरी काव्याचे गुण दृष्टीस पडतात तरी नानारूपधर ईश्वराचे स्तवन ह्या त्यांतील विषयगौरवामुळे न विशेषतः एकंदर श्रुतीविषय असलेली जी प्रामाण्यभावना व पूज्यबुद्धि व्यांमुळे