पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२०

आहे. ह्यावरून श्रुतीचें स्वरूप निष्कलंक शुद्ध राहण्यास ज्याप्रमाणे पदपाठ हा कवचाप्रमाणे आहे तद्वतच श्रुतींचा सूक्ष्मार्थ व सत्यार्थ निश्चित करण्याचे कामी स्वन हे आदर्शभूत आहेत. “इन्द्रशत्रु " ह्या शब्दाच्या स्वनाविषयींची आख्यायिका बहुतेकांस विश्रुत असेलच. वेदांचा बरोबर अर्थ करण्यास स्वन है एक अत्युत्कृष्ट साधन झाले आहेत हेंच वरील आख्यायिकेवरून आपणांस दिसून येते. ह्यामुळे श्रुतीच्या स्वनांत किंवा अक्षरांत यत्किचितूही फेरबदल न होऊं देण्याविषयीं जी पूर्ण खबरदारी आजपर्यंत घेतली जात आहे तिजवरून तिच्या सकारणत्वाची व कार्यगौरवाची थोडीबहूत कल्पना करितां येऊन त्यावरून वेदां- मध्यें स्वनांची प्रतिपत्ति काय आहे हे लक्ष्यांत आल्याशिवाय राहणार नाहीं. तथापि, ज्या श्रुति आपल्या अतिप्राचीनत्वामुळे आणि सनातनत्वाच्या आविष्क- -रणामुळे सद्धर्माचें उत्पत्तिस्थान झाल्या असून ज्यांचे ठिकाणीं धर्मनियामक शक्ति •वास करीत आहे, व आपलें मूळचे आणि खरें स्वरूप रक्षण करण्याची व मूळ • अर्थात विपर्यास न होऊ देण्यास शक्य ते उपाय योजण्याची ज्या ग्रंथाने आ- पण आर्याच्या मनांत प्रेरणा केली व तदनुसार वर्तन करवून तें महत्कार्य आपल्या हांतून घडविलें--इतकी, जो ग्रंथ आपल्या आपल्या हृदयांत, अप्र- तिहत सत्ता चालवीत आहे व परकीय लोकही ज्या ग्रंथाविषयीं इतकें प्रेम, निष्टा, पूज्यता व सन्मान प्रकट करीत आहेत, तो ग्रंथ अपौरुषेय असल्या- बद्दल जो आपला विश्वास त्यास ह्यावरून बराच आधार मिळतो एवढी गोष्ट जातां जातां शेवटीं कळविणें इष्ट आहे.