पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९

इति' ); क्षत्रं रक्षेथे अकवै रदब्धा ( रक्षेथे इति' ); त्वे अग्ने विश्वे अमृतासः (त्वे इति', कारण " त्वाय " बद्दल " त्वे " घातलें आहे ); युमदस्मे सुवीर्य' ( अ॒स्मे इति', कारण " अस्मे " हे " अस्माकं " ह्याचा संक्षेप आहे ); प्रजार्वद- स्मै दिधिषन्तु रत्नं', येथें अस्मे - अस्माकं ; ओ षु वर्त मरुतः सर्मुप्रिया आर्ववृत्रन् ( ऊं इति, कारण पदपाठांत "उ" बद्दल तात ); यन्मानु॑षा य॒क्ष्यमाणा अजीगः ( अजी गरिति ).
 ह्याप्रमाणे वैदिक स्वरप्रक्रियेचें सामान्य स्वरूप आहे. स्वनवैविध्याच्या प्रयोजनाचे दिग्दर्शन वर केलेच आहे: तथापि व्याकरणदृष्ट्याही स्वनांचा फार उपयोग आहे. एकाच स्वरूपाची निरनिराळ्या विभक्तीची रूपे, व एकाच स्वरू- पाचीं नामें व विशेषणें वगैरे, ही स्वनभिन्नत्वावरून तत्क्षणी ओळखितां येतात. ह्या योगानें अर्थ करण्याचे प्रसंगी स्वनांकडून अत्युत्तम साहाय्य होतें. सुदानुः ह्या शब्दाचे प्रथमेचे व संबोधनाचे बहुवचन " सुदानवः " असेंच आहे. परंतु प्रथमेचें “सुदानवः " असें व संबोधनाचें सुदानवः असे सर्वानुदात रूप असल्यामुळे कोणतें विवक्षित आहे हैं बिनचूक समजते. तसेच, “अपः हैं आयुदात्त पद कर्माथी असतें व " अपः " हैं अन्तोदात्त पद विशेषणार्थी असतें. ह्यामुळे अर्थाविषयी संशय राहण्यास अवसर कचितच असतो. कांहीं प्रसंगीं तर पदांचे अस्तित्वसुद्धां स्वनभिन्नत्वाच्या योगानेंच माहीत पडते. जसें, “ अवसा च॑क्रे ” किंवा “ पिबा वृषस्व " ह्यांची पदें अनुक्रमें अवसा आ चक्रे " व “ पिर्ब आ वृषस्व ” अशी आहेत. परंतु ती तशीच असली पाहिजेत ह्यावि षयीं त्यांचे स्वजविशेष हेच निर्विवाद आधार होत. वरील उदाहरणांत 'अवसा हें पद आयुदात्त असून ज्याअर्थी त्याचा “सा ” संहितेत उदात्त झाला आहे ( कारण त्यावांचून " व " अनुदात्ततर होणार नाही ) त्याअर्थी "सा व" सा" त्या मूळच्या अनुदात्तांत "आ" हा उदात्त मिळाला असलाच पाहिजे हे उघड