पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८

मन॑सा॒ देव॒यन्त॑ वी॒र्या॑णि+इन्द्र॑ वोचीणीन्द्र. त्या शेवटच्या उदाहरणांतील कंप ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. "वीर्याणि ह्यांतील “णि” अनुदात्त होती. परंतु पुढें “ इ ” उदात्त असल्यामुळे “णी झाला. असा संधि झाला तेव्हांच " र्या" ह्या केवल स्वरितासंनिध "णी "हा उदात्त येऊन दीर्घ कंप झाला
 पदपाठामध्ये आपणांस कित्येक पदांपुढे " इति हें पद जोडलेले दृष्टीस पडतें. त्याचें कारण असे आहे कीं, ज्यांच्यापुढे " इति ” हें पद घात लें असतें तीं पदे प्रगृह्यात असतात. ज्या स्वरांचा, पुढील स्त्ररांशी संधि होणें युक्त असतांही, संधि करीत नाहींत त्यांस "प्रगृह्य" अशी संज्ञा आहे "ईकारान्त "ऊ" कारान्त आणि " ए "कारान्त द्विवचनें," अमी " इ० सर्वनामांची अनेक वचनें," ओ " कारान्त संबोधने आणि चतुर्थी, सप्तमी इ० विभक्तीच्या जागीं योजिलेलें त्यांची गणना मुख्यत्वेकरून- "इ" कारान्त किंवा " ए "कारान्त संक्षिप्त रूप, प्रगृह्य स्वरांत करितात. श्रुतीत प्रगृह्यान्त पढ़ें, क्रियापदांची " ए "कारान्त द्विवचने, “ई” हैं प्रथमेचें रूप, व “उ”, “ओ” “अथो" इ. अव्ययें, त्यांच्यांतील विशेषांकडे लक्ष्य जावें ह्मणून त्यांच्यापुढे व विसर्गरुपी “र”कारान्त पद पादाच्या शेवटीं असल्यास त्यापुढे " इति " हैं अधिक पद पदपाट करितांना, घालण्याची पद्धत आहे. " इति " हैं पद आबुदान्त आहे आणि तें जेव्हां मागील पदाशी संयुक्त असतें तेव्हां त्याच्या संनिधानामुळे पूर्व पदांतील स्वनांत पर्याय होऊं शकतात. उदा०--सं मात्राभिर्ममिरे येसुरुवा अन्तर्मही समृते धा- 'यसधुः ( उवा इति', मही इति ); हरी सखाया सुरा स्व ( हरी इति' ); कृष्णष्टृतौ' वेविजे अ॑स्य सक्षिता (वेविजे इति' ); उत त्वमस्मयुर्वसो ( बसो इति'); श्लोकं यसंसत्सवितेव प्रभाहू ( बाहू इति ' ); अमी ये देवा स्वन (अमी