पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७

 दोन स्वरांचा संधि झाला, परंतु त्यांचे ठिकाणी एकाच स्वराचा आदेश न होत दोन पृथक् स्वर आले, तर अर्थात् त्यांच्या पूर्वीच्या वनांचा संधि होत नाहीं. उदा०—पुंसः+आहुः पुस आहुः अन्ये +उपरे अन्य उपरे.
 आतां वर सांगितलेल्या केवलस्वरिताची एक महत्वाची विक्रिया अशी आहे की, केवल अ० स्वाभाविक त्वरिताक्षरापुढे उदात्ताक्षर येऊन त्याचा त्याच्यापाशी संधि न होतां ते जर फक्त त्याच्यासंनिध राहील, तर त्या पाठीमागच्या केवलस्वरिताचें पृथक्करण होते. ह्या वेळेस त्या स्वरितांत अंतर्हित असलेल्या उदात आणि अनुदात्तांचा ( कारण स्वरित हा, उदात्त आणि अनुदात्त मिळून झालेला आहे ) पृथक् उच्चार होतो; परंतु तो निरनिराळ्या स्वरांचा उच्चार जलद झाल्याने स्वनांत कंप उत्पन्न झालासा वाटतो. ह्मणून त्या पृथकरणास " कंप" हेंच नांव दिले आहे. कंपाची १ आणि ३ अशी दोन चि आहेत. ही चिलें त्या स्वारीत अक्षराच्या पुढे लिहितात व त्या वेळेस त्या अक्षराच्या शिरोभागी पुन्हां स्वर- ताचे चिन्ह करीत नाहीत. केवलस्वरिताक्षरांतील स्वर म्हस्व ( अशा प्रसंगी " अं " आणि " अ: " ह्यांची गणना -हस्व स्वरांतच केली जाते) असल्यास त्या अक्षरापुढे १ ही खूण करितात, व दीर्घ असल्यास ३ हे चिह्न पुढे लिहून त्या अक्षराखालीही अनुदात्ताचे चिह्न करितात. ह्या कंपाचा उच्चार पहिल्या कंपापेक्षां दीर्घ असून ह्यास " त्रिकंप " अशी विशिष्ट संज्ञा आहे.
  केवल स्वरितापुढील उदात्ताचा त्याच्यावर परिणाम घडण्याचे ( पर्दे पृथक् झाल्यामुळे वगैरे ) जेव्हां बंद होईल तेव्हां कंप होणार नाही. उदा०- देवी+उषाः=देन्यु+षाः=देव्यु १ षाः. त्यांत' 'व्यु" हा स्वरित हस्व आहे व षाः " हा उदात आहे. तन्वं दधानः तन्वं १ दधानः; सधन्यः+त्वोताः = सवन्य १ स्त्वोताः; पर्थ्या+का समे तपस्या ३ का समेति वाप्यो ३.