पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६

 याचप्रमाणे. केवलस्वरितापुढे उदात आल्यास त्यांच्या संधीमध्ये स्वरा- वर उदातच होतो. परंतु ज्याच्यावर केवलस्वरित आहे त्या स्वराचा आणि उदात्तयुक्त स्वराचा संधि होत असेल त्याच वेळेस हा नियम चालतो, हॅ पक्के लक्षांत ठेविले पाहिजे. उदा० - क + इति 'क्रेति'; “ स्पाही वरा मनुष्या द॑दीहि ” ह्या चर्चेत “न॒नु॒ष्या" हे रूप "म॒नु॒ष्या॑ +आ" ह्यापासून झालेले आहे.
 उदातापुढे उदात्त असल्यास अथवा अनुदात्तापुडे किंवा सव्यपेक्ष स्व. रितापुढेही ( कारण तो मूळचा अनुदात्तच असतो ) उदात्त असल्यास दोन्ही ठिकाणी संधीमध्ये फक्त उदात्त होतो. उदा०-
 उदात्त उदात्त वि+आर्श= व्यार्श; न+अवाजिन=नावाजिनं; न+अदी'- देत् = नाददेत्.  अनुदात्त + उदात्त - वीरस्य॑ सु+अन्य = वीरस्य स्वयं; अधि+अर्धत्तम् = अ॒ध्यव॑त्त॒म् ; प्र+अ=प्राप्यं.
 सव्यपेक्षस्वरित+उदात्त वत्से बष्कये + अधि' सप्त तन्तून् वत्से बष्कयेधि' सप्त तन्तून् ; " प्रत्नो होता विवासते वाम् " ह्यांत होत+आ अशी पदे आहेत.  केवल अथवा सव्यपेक्ष स्वरितापुढे अनुदात्त आल्यास दोहोंचाही स्वरित होतो. जसे- क + इव- केवे; ये रथ्येव जग्मुः ( रथ्या+इव ).
 अनुदात्तापुढे अनुदात्त आला असतां यांचा संधि अनुदात्तच होतो, व सव्यपेक्ष स्वरितापुढे किंवा अनुदात्तापुढे अनुदात्ततर येत असेल तर संधि अनुदा- त्तंतर असतो. जसे - तंपूषि + अग्ने = तंपूष्यग्ने; ब्रह्माणि+ अंगिरः = ब्रह्माण्यांगेर:;- प्रति + अग्निः प्रत्यग्निः; मत्येषु + अमृतः = मत्यैष्वमृतः, इंद्र+अय = इन्द्रायः . सूनो - मीनेनाश्विना कृ॒णाना ( मानेन+अश्विना ); योषा + अवृणीत योषावृणीत;अन्यस्य + आसा=अन्यन्यासा.