पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१५

 दोन विसदृश स्वर ( अच् ) संनिध आले असतां पूर्वीच्या स्वराचे जागी जेव्हां यवर्गातील वर्णाचा आदेश होतो ( ह्या संधीस " यणसंधि " अशी संज्ञा आहे ) तेव्हां त्या दोन विसदृश स्वरांपैकी जर पहिल्याचा स्वन उदात्त च दुसऱ्याचा अनुदात्त असेल तर मागें सांगितल्याप्रमाणें अनुदानाचा स्वरित होतोच, तथापि ज्या पूर्वीच्या स्वरावर उदात्त असतो त्या स्वराचे जागीं यव- गतील व्यंजनाचा आदेश होत असल्यामुळे तो उदात्त, आश्रयीकृत स्वर नष्ट झाल्याकारणानें, निराधार होऊन लोप पावतो. तरीही त्यापुढील स्वस्ति वरील संधीमध्ये तसाच कायम राहतो. उदा० - वि+ओमनि= विओमनिव्य+ ओमनि= व्योमनि. यांत " वि" ह्या उदात्तानंतर "ओ" हा अनुदान आला ह्मणून त्याचा स्वरित झाला; आणि “वि " ह्यांतील “इ” उदात्त होती, परंतु तिचे स्थानी "य" चा आदेश झाल्यामुळे, आणि "य" हैं एक व्यंजन असल्याकारणानें त्यावर कोणताही स्वनविशेष येण्याचा संभव नसल्यामुळे, "३" वरील उदात्त निराधार होऊन लोप पावला. परंतु अशा रीतीनें पाठीमागचा उदान नाहीसा झाला असताही. पुढील " ओ " वरील स्वरित कायमच राहिला आहे. ह्मणून अशा प्रकारच्या स्वरितांस, पाठीमागें उदात्त असण्याची बिलकूल गरज न लागणारे स्वरित ह्मणजे, "केवल " किंवा "स्वाभाविक " त्वरित असें ह्मणावें. हे " केवल " स्वरित, यवर्गातील जोडाक्षरांशिवाय इतरत्र प्रायः कधीही होत नाहींत, व त्यांतील विसदृश स्वरांपैकी पहिल्यावर मूळचा नेहमी उदात्त न दुस-यावर मूळचा नेहमी अनुदात्तच असतो. उदा० - वि + अख्यन् व्यख्यन्; वि+आनुषक्=व्यानुषक् ; दिवि + अस्तभायत् = द्विव्य॑स्तभायत्; नु+अस्यन्वस्य.
 दोन स्वरांचा जेथें यण संधि होत नाहीं तर तद्यतिरिक्त सवर्णदीर्घ संधि इ० दुसरे संधि होतात अशाच फक्त संधीत दोन स्वरांपैकी पहिला उदात्त व दुसरा अनुदात्त असला तरी त्यांचा संधि उदान होतो. उदा०-त्वा+ऊताः= त्वोतः; प्र+आवन=प्राव॑न्; दिवि + ईयते-दिवीयते; अघ्न्या+इयं=अघ्न्येयं.