पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४

“ता” ही अक्षरें उदात्त व " इन्द्र "मा" आणि “ प्र " हीं अनुदात्त आहेत.
 स्वरितानंतर येणारे अनुदान हे संहितेत द्वितीय किंवा चतुर्थ पादाचे शेवटी आल्यास त्यांचा उच्चार कांहींसा उदात्तांप्रमाणे करितात. अनुदात्तांच्या अशा प्रकारच्या उच्चारास " प्रचय " असें नांव आहे. उदा० -- प्रसुशंसा मतिभिस्तारिषीमहि.
 श्रुतीतील अक्षरस्वनांत जे फेरफार होतात त्यांमध्ये स्वरितत्त्वनाच्या एका विशेष भेदामुळे होणारे फेरफार बरेच अपूर्व आहेत. उदात्तापुढें जो स्वरित असतो तो मूळचा स्वरित नव्हे हें वर सांगितलेच आहे. तो उदानानंतर येणाऱ्या पहिल्या अनुदात्ताचा बनलेला असतो व पूर्वीचा उदात्त दूर होतांच पुन्हां पूर्ववत् अनुदात्तच राहतो. जसें आशासते. यांत “शा" स्वरित आहे खरा. परंतु त्याच्यामागें उदात्त असल्याचा हा परिणाम आहे. पदच्छेद करून उदात्त पृथक् करितांच "शा " पूर्वीप्रमाणे अनुदात्त होतो. जसें आ । शासते ।. तेव्हां जो स्वरित पाठीमागें उदात्त असल्याखेरीज स्वरित राहू शकतच नाही. त्यास, उदात्ताची जरूर असणारा स्वरित, अथवा, "सव्यपेक्ष " स्वरित असें ह्मणावें. स्वरिताचा दुसरा जो महत्त्वाचा भेद आहे तो फक्त यणसंघांतच उत्पन्न होत असल्यामुळे त्याचा विचार पुढे केला आहे.

 स्वरसंधींमुळे त्यांच्या स्वनांत होणारे पर्याय.  स्वनविशेष हे स्वरोच्चाराचे मात्र भेद आहेत. ह्मणून त्यांचे स्थान फक्त स्वर (अच् ) हेच होत. स्वरांचा परस्परांशी संधि झाला ह्मणजे अर्थात् तदा- श्रित स्वनविशेषांचाही संधि होतो. त्यामुळे, कांही स्वनांच्या केवळ सांनिध्यामुळे ज्याप्रमाणे इतर स्वनांच्या स्वरूपांत विक्रिया होते त्याप्रमाणें त्यांचा संधि झाला असतांही होते.