पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३

चिह्नरहित राहिले. पदविवृतीमुळे ते अनुदात पाठीमागच्या उदास उ० पासून पृथक् होतील तेव्हा अर्थात् त्यांच्याखाली स्वनदर्शक चिह्न केले पाहिजे. जसें - आत् । इन्वति ।.
 स्वरित किंवा उदात्त ह्यांचेपुढे अनेक अनुदात्त येऊन त्यानंतर लागलाच पुन्हां दुसरा स्वरित किंवा उदात्त आल्यास, पूर्वीच्या उदातानंतरचा पहिला अनुदात्तस्वरित होऊन, पुन्हां पुढे आलेल्या उदात्ताच्या किंवा स्वरिताच्या पाठीमागचा पहिला त्वरित अनुदात्ततर होतो. वरकड मधले अनुदात्त तसेच चिह्नरहित असत्तात. अनुदात्ततर अक्षराखाली मात्र नेहमी स्वनचिद केले पाहिजे. " अयं ते अस्तु हर्य॒तः सोमः " येथे “वं " हे उदात्त, त्यानन्तर " ते अस्तु हर्य " हीं अक्षरें अनुदात्त आणि पुन्हां “तः " हैं उदात्त आले आहे. त्यामुळें “ते' ” स्वरित व " ये " अनुदात्ततर होऊन बाकीची अक्षरे तशीच चिह्नरहित राहिली आहेत. परंतु पदपाठांत अयं । ते। अ॒स्तु। ह॒र्य॒तः । सोमः । अशी रूपे येथपर्यंत दिलेल्या नियमान्वये होत आहेत. त्याचप्रमाणे “स आ वत्स्व हर्यश्व यः " ह्या संहितेची पदे सः । आ । वत्स्व हरिअश्व | यज्ञैः ” अशीं पडतात. “प्रियासः+अजनयन्त " ह्यांची संहिता " प्रियासीजन- यन्त” अशी होईल. परंतु त्यांपुढे "वृष्णे " असे आयुदात्त पद ठेवितांच वरील संहिता " प्रियासेोजनयन्त वृष्णे " अशी होते.
 वरील सर्व नियमांवरून असे स्पष्ट दिसून येईल का<br.  ( अ ) कोणतेही स्वनचिह्न नसलेलें अक्षर पदारंभी असेल, अथवा त्या अक्षरानंतर अक्षर स्वनचिह्नरहित किंवा स्वरित असेल, अथवा त्या अक्षरा पूर्वीचे अक्षर स्वनचिहरहित किंवा अनुदात्ततर असेल तर ते चित्र नसलेले अक्षर निःसंशय उदात्त असतें. आणि त्याप्रमाणेच.
 (आ) स्वरितानंतर येणारी सर्व चिह्नरहित अक्षरे अनुदात असतात त्वे राय॑ इन्द्र तोशर्तमाः प्रणे॒तारः " ह्यांतील "खे, "" रा" "श" आणि