पान:सायणभाष्यप्रदीपिका.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२

अनुततर झाले. पदे विभक्त झाल्यास वरील पुढल्या पदांचे माहात्म्य रहात नाही. त्यामुळे पदपाटांत पूर्वोक्त अनुदात्तांची बृहस्पतिः । सः हि अंजः । वरांसि । अशी स्वरित रूपे होतात. " याभिर्व्यश्वम् " येथे "व्यं " हैं अक्षर स्वरित असल्यामुळे मागील अनुदात्त अक्षर " भि: " अनुदात्ततर झालें. परंतु पदं विभक्त होतांच "भिः " स्वरित होते. याभि: । व्यश्वम् । .
ज्या एक किंवा अनेक अनुदात्तांच्या फक्त पुढे उदात्त वगैरे असून पाठीमागे कोठेही उदात्त किंवा स्वरित नसतो, अथवा, पुढे आणि मागे दोन्हीकडे एकही उदात्त किंवा स्वरित अक्षर असत नाही, अथवा, असूनही पदपाठांतील पदभिन्नत्वा- स्तव निरुपयोगी होत असते, अशा एक किंवा अधिक अनुदात्त अक्षरांखाली ( ह्मणजे पदपाठांत, सर्वानुदात्त पदाखाली) सदैव स्वनचिह्न लिहिलें पाहिजे. “ हवामहे ” “ इन्द्र" ही पदं सर्वानुदात्त आहेत. “ अभिस्वरे' ह्यांत " अभि- स्व " ह्यांच्यापुढे “रे" उदात्त आहे परंतु पूर्वी नाही, ह्मणून " स्व प्रमाणे बाकीच्या अक्षरांखालीही खनचिह्न करणें भाग पडले.

 स्वरितापुढे, ज्यांच्यापुढे पुन्हां उदात्त किंवा स्वरित नाही असे अनुदात्त कितीही आले तत्रापि ते सर्व तसेच अनुदात्त राहतात; त्याचप्रमाणे उदा- तापुढे वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे कितीही अनुदात्त आले तरी त्या उदात्तानंतरचा पहिला अनुदात्त मात्र स्वरित होत असून इतर सर्व अनुदात्त, पूर्ववत् राहतात. परंतु जोपर्यंत मागील उदात्त वगैरेंचा परिणाम त्यांवर घडत आहे तोपर्यंत अशा अनुदात्तांखाली तद्दर्शक चित्र करावयाचे नाही. " ऊर्ध्वस्तस्थौ नेमवं ग्लापयन्ति " ह्यांत “ ग्लापयन्ति" हे पद सर्वानुदात्त ( ग्लापयन्ति ) आहे. परंतु लें " व या स्वरितापुढे असल्यामुळे त्याच्या खाली स्वनचिह्न केलें नाहीं. तसेच “ आदिवसि " येथे " आ " ह्या उदात्तापुढें " दि" हैं अनुदात्ताक्षर आल्यामुळे ते तेवढेच स्वरित झाले व " न्वसि” हे अनुदात्त तसेच